---Advertisement---

प्रतिकूल परिस्थितीतही हिरवागार मिरचीचे पीक; बिरादार बनले नदीवाडीचे आदर्श शेतकरी !

By team
On: March 16, 2026 4:48 PM
Follow Us:
---Advertisement---

लातूर : वृत्तसंस्था 

नदीवाडी येथील शेतकरी रामदास शिवाजी बिरादार यांनी प्रतिकूल परिस्थितीतही मेहनत, जिद्द आणि योग्य नियोजनाच्या जोरावर मिरची शेतीत आदर्श निर्माण केला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवते आणि अनेक शेतकरी शेती करायला मागेपुढे होतात. मात्र रामदास बिरादार यांनी या आव्हानाला संधी मानत आपल्या शेतात मिरचीची लागवड करून उत्कृष्ट प्लॉट तयार केला आहे.

मर्यादित पाण्याच्या उपलब्धतेतही योग्य नियोजन, वेळेवर मशागत आणि पिकाची निगा राखत त्यांनी मिरचीचे पीक जोपासले. परिणामी, त्यांच्या शेतातील मिरचीचा प्लॉट हिरवागार, दाट आणि आरोग्यदायी दिसतो असून परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

रामदास बिरादार यांच्या मेहनतीमुळे आज हा मिरचीचा प्लॉट परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. अनेक शेतकरी त्यांच्या शेतात येऊन शेती पद्धतीची माहिती घेत आहेत आणि आपल्या शेतीत सुधारणा करण्यासाठी प्रेरणा घेत आहेत.

नदीवाडी गावातील या कष्टाळू शेतकऱ्याने आपल्या जिद्दीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीतून चांगले उत्पादन कसे मिळवता येते हे स्पष्ट दाखवले आहे. गावकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले असून रामदास शिवाजी बिरादार आता नदीवाडी गावातील आदर्श शेतकरी म्हणून ओळखले जात आहेत.

या यशामुळे परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण तयार झाले असून शेतीत तंत्रज्ञान, नियोजन आणि चिकाटीच्या माध्यमातून उत्पादन वाढवता येते, हे सिद्ध झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!