जम्मू : शिवसेना जम्मूमध्ये विधानसभेच्या निवडणुका लढवणार असल्याची घोषणा शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत हे कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभाग होण्यासाठी जम्मू – काश्मीर मध्ये दाखल झाले आहेत. यावेळी राऊत यांनी प्रसार मध्यमांशी संवाद देखील साधला.
शिवसेना नेते व खासदार संजय राऊत हे आज जम्मू येथे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. जम्मूत आज पाऊस पडत आहे. मात्र पावसातही राहुल गांधी व संजय राऊत हे पदयात्रा करत आहेत.
Video Credit – @ANI pic.twitter.com/v4V3Fn4Xj9— Saamana (@SaamanaOnline) January 20, 2023
संजय राऊत बोलताना म्हणाले की, भारत जोडो यात्रेची चांगली वातावरण निर्मिती आहे. पक्ष म्हणून नाही पण देशात चांगला संदेश जात आहे. पठाणकोटला हजारो तरुण मशाली घेऊन निघाले होते. मशाली काय काँग्रेसचं चिन्हं नाही. ते शिवसेनेचं चिन्हं आहे. मलाही भरून आलं. देश जागवण्यासाठी सर्वांना हातात मशालच घ्यावी लागते. असे ते म्हणाले. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. देशातील महत्त्वाचा पक्ष आहे. राहुल गांधी यांचं नेतृत्व तळपताना दिसत आहे. लोकं त्यांना स्वीकारत आहेत. असे त्यांनी म्हटले आहे.