---Advertisement---

मराठा मंदिरचे ज्येष्ठ विश्वस्त शंकरराव पालदेसाई यांचा अन्नछत्र मंडळाकडून सत्कार

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या महाप्रसादाची सेवा व दूरदृष्टीचे नेतृत्व असल्यानेच एका छताखाली स्वामी भक्तांना सोयी सुविधा देणारे राज्यातील एकमेव न्यास असल्याचे मनोगत मराठा मंदिर मुंबईचे जेष्ठ विश्वस्त शंकरराव पालदेसाई यांनी व्यक्त केले.

ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र (ट्रस्ट) मंडळात आले असता मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी मराठा मंदिर विद्या वर्धनीचे अध्यक्ष योगेश पवार, सचिव मनोहर साळवी यांचा देखील श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यांच्या समवेत शालेय समितीचे सदस्य सुरेशराव फडतरे, श्री शहाजी प्रशालेचे मुख्याध्यापक सुदेश कांबळे, अरविंद शिंदे, गजेंद्र घाडगे, चेतन जाधव हे उपस्थित होते.

यावेळी मंडळाचे सचिव शामराव मोरे, सिद्धाराम कल्याणी, एस.के.स्वामी, बाळू पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, बाळासाहेब घाडगे, दत्ता माने, योगेश पवार, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

पुढे वाचा

Leave a Comment

Don`t copy text!