ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भाजपाला आणखी एक मोठा धक्का : ‘या’ माजी मंत्र्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर आता भाजपला आणखी धक्का बसला आहे.  बीड जिल्ह्यातील भाजपचे माजी खासदार आणि माजी मंत्री जयसिंग गायकवाड यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पटली यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीने भाजपने धक्का दिला आहे.

मागील आठवड्यात जयसिंग गायकवाड यांनी बंडाचे निशाणा फडकवून भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मराठवाड्यातील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून जयसिंगराव गायकवाड यांची ओळख आहे. औरंगाबाद पदवीधर निवडणूक भाजपच्या तिकीटावर जयसिंगराव गायकवाड इच्छुक होते. परंतु भाजपकडून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे गायकवाडांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी गायकवाडांनी उमेदवारी मागे घेतलीच, परंतु भाजपलाही सोडचिठ्ठी दिली होती.

आज मुंबईत राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.  जयसिंग गायकवाड हे तीन वेळा बीडचे खासदार तसेच पदवीधर मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिलेले आहे.

राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जयसिंग गायकवाड यांनी भाजपवर सडकून टीका केली. ‘ज्या पक्षात कसा राहू जो मान सन्मान नाही, चांगल्या कार्यकर्त्यांचा वाळवंट केला जातो. नितीन गडकरी यांचे काय हाल सुरू हे सगळ्यांना माहिती आहे. काही खुकांर लोकांनी भाजपचा ताबा घेतला आहे, अशी विखारी टीका गायकवाड यांनी केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!