कुरनूर, दि.२७ :स्त्रियांना कमी लेखण्याची परंपरा काही नवीन नाही.यापूर्वी महिलांना चूल आणि मुल या
दोन गोष्टी पुरतेच मर्यादित ठेवले होते.
परंतु अलीकडच्या काळामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये महिला कमी नसून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.आता महिलांनी यापुढेही जाऊन देशाचे भवितव्य घडवावे,असे प्रतिपादन अक्कलकोट महिला काँग्रेसच्या अध्यक्षा युवा नेत्या शितल म्हेत्रे यांनी केले.अक्कलकोट येथे स्वामिनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा शोभा इचगे यांनी आयोजित केलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमात त्या बोलत होत्या.पुढे बोलताना म्हेत्रे म्हणाल्या की, महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी बनावे.तरच स्त्रियांची प्रगती होणार आहे.म्हणून ग्रामीण भागातील स्त्रियांनी बाहेर पडावे आणि स्वतःचे भविष्य घडवण्यासाठी कोणावरही अवलंब न राहता स्वतःच पुढे यावे,असेही ते म्हणाल्या. त्यानंतर सविता बाके यांनीही बचत गटाच्या उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.यावेळी डॉ.शिवलीला माळी,सुनिता हडलगी,भाग्यश्री ताड, सुनंदा भकरे,प्राची इचगे,गंगाबाई स्वामी, स्वाती जमगे,सोनली इचगे,महानंदा नवभागे,लक्ष्मी आंदोडगी यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.