अक्कलकोट शाखा अभियंता मुबीन पानगल यांची तडकाफडकी बदली;रिपाईने केली होती निकृष्ट दर्जाच्या रस्त्याची तक्रार
अक्कलकोट,दि.५ : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील अक्कलकोट विभागाचे शाखा अभियंता मुबिन पानगल यांची कार्यकारी अभियंत्यांनी तडकाफडकी बदली केली आहे.चार दिवसांपूर्वी हैद्रा, नागणसूर,नाविदगी,कलहिप्परगे येथे प्रधानमंत्री ग्रामसडक योजन अंतर्गत रस्त्याचे काम
सुरू आहे.ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. केवळ आठ दिवसांत डांबरीकरण उखडून गेले आहे.सदर रस्त्याचे कामावरील शाखा अभियंता मुबिन पानगल व ठेकेदार यांची चौकशी होऊन तात्काळ निलंबित करावे तसेच ठेकेदार यांचे नाव काळ्या यादीत टाकावी,अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी केली होती.याची दखल घेऊन कार्यकारी अभियंता डी. डी. परदेशी यांनी कारवाई केली आहे. सध्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे पण ठेकेदार यांच्यावर कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.यापूर्वी मिरजगी फाटा ते सांगोगी(आ) सह तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे काम केले आहे.त्या ठिकाणी अशाच प्रकारच्या तक्रारी आलेल्या आहेत.रस्ते सुद्धा निकृष्ट दर्जाचे झालेले होते.सर्व कामे एकाच ठेकेदाराला का मिळत होते,याची चौकशी करण्याची मागणी रिपाईने केली आहे.
निकृष्ट दर्जाच्या
रस्त्याचे काय ?
माझ्या तक्रारींचे दखल घेऊन शाखा अभियंता यांच्यावर कारवाई करण्यात आली. याचे मी आभार मानतो.मात्र केवळ अधिकारी यांच्यावर कारवाई करून चालणार नाही तर रस्त्याची गुणवत्ता तपासून निकृष्ट दर्जाचे काम केलेल्या ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी.अशी आमची प्रमुख मागणी आहे.
अविनाश मडिखांबे,तालुकाध्यक्ष रिपाई