बारावीच्या बोर्ड परीक्षेला आजपासून सुरुवात ; निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे अधिक कालावधी देण्याचा निर्णय
पुणे : बारावीच्या बोर्ड परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. परीक्षा अकरा वाजता सुरू होणार आहे त्यासाठी विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी हजर राहाव लागणार आहे तर दुपारच्या सत्रातिल परिक्षेला तीन वाजता सुरू होणार असून विद्यार्थ्यांनी अडीच वाजता परीक्षा केंद्रात उपस्थित राहाव लागणार आहे.
कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडावी, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. यंदापासून १० मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने रद्द केला आहे. यासह मंडळाने निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे अधिक कालावधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बारावीच्या परीक्षेला १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थी बसले आहेत. २७१ भरारी पथके संपूर्ण राज्यभरात परीक्षा दरम्यान काम करणार आहेत. परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होण्यापूर्वी तपासणी केली जाणार आहे. तसेच सीसीटीव्हीसुद्धा असणार आहे.