---Advertisement---

शिवजयंतीनिमित्त अक्कलकोट तालुक्यात नऊ जणांना आदर्श पुरस्कार जाहीर ; सांगवी बुद्रुक श्री शिवछत्रपती तरुण मंडळाचा उपक्रम

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.२० : शिव जयंतीनिमित्त सांगवी बुद्रुक (ता. अक्कलकोट) येथील श्री शिवछत्रपती तरुण मंडळाच्यावतीने देण्यात येणारे विविध क्षेत्रातील आदर्श पुरस्कार जाहीर झाले आहेत.याबाबतची माहिती आयोजक मेजर बाळासाहेब भोसले व विष्णू भोसले यांनी दिली आहे. येत्या बुधवारी सायंकाळी साडे सात वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

यात विलास सोनकांबळे (आदर्श सैनिक), मारुती बावडे (आदर्श पत्रकार), विवेक शेकापुरे (छत्रपती रत्न), डॉ.आर. व्ही. पाटील (आदर्श सेवा), अनिल भोसले (आदर्श शेतकरी ), रघुनाथ कापसे, (आदर्श शेतकरी) मौला मुजावर (सद्भावना), अशोककुमार सुतार (आदर्श शिक्षक), महावीर येणेगुरे (आदर्श शिक्षक ) असे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

यात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच अरुणकुमार तळीखेडे यांची भारतीय माजी सैनिक संघटना राज्य उपाध्यक्षपदी व कॅप्टन दिलावर शेख यांची भारतीय माजी सैनिक संघटना सोलापूर जिल्हा
सेक्रेटरीपदी निवड झाल्याबद्दल सांगवी बुद्रुक ग्रामपंचायतीच्यावतीने नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थिती राहणार आहे.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांचे व्याख्यान होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री शिवछत्रपती तरुण मंडळ व ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

पुढे वाचा

Leave a Comment

Don`t copy text!