‘’या’’ दोन बँकांच्या ग्राहकांसाठी वाईट बातमी ; दोन बँकांपैकी महाराष्ट्रातील एका नामांकित सहकारी बँकेचा समावेश
मुंबई : रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने या बँकांच्या बचत आणि चालू खात्यावर पैसे काढण्याची मर्यादा ५ हजार रुपयांपर्यंत मर्यादित केली आङे. रिझर्व्ह बँकेने हा निर्णय कमकुवत लिक्विडीटीमुळे घेतला आहे. या बँकांच्या यादीत आंध्रप्रदेशमधील उरावकोंडा को आॅपरेटिव्ह बँक आणि महाराष्ट्रातील शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेचा समावेश आहे.
रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, हे निर्बंध २४ फेब्रुवारीपासून लागू करण्यात आले आहेत. या तारखेपासून पुढील सहा महिन्यांपर्यंत ते लागू राहतील. आरबीआय या निर्णयाची समीक्षा करणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या पुढील निर्देशानंतरच या दोन्ही बँकांवरील निर्बंध हटवण्यात येतील. या कालावधीत बँका कोणत्याही प्रकारची नवी गुंतवणूक करु शकणार नाहीत.. दोन्ही बँका कोणताही करार अथवा त्यांच्या प्राॅपर्टीसंदर्भातील कोणताही करार करु शकणार नाहीत.