कुरनूर : २००१ साली पुनर्वसन झालेल्या अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर गावाला प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची गरज भासत आहे. रात्री अपरात्री अनेक शेतकरी हे शेतीच्या कामानिमित्त धरणाकडे जात असतात एखाद्याला जर सर्पदंश झाला तरी त्याला तात्काळ जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेता येत नाही कारण जवळील चुंगी रस्ता पाहिला तर हा दुरावस्थेत रस्ता आहे. अक्कलकोट ला जाण्यासाठी तोही रस्ता परिपूर्ण नाही. त्यामुळे रुग्णाची गैरसोय निर्माण होते त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राची नितांत गरज आहे त्यामुळे यास आपण मंजुरी देऊन हे काम पूर्णत्व लावावे अशी विनंती कुरनूर चे विद्यमान सरपंच व्यंकट मोरे यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केली आहे.
या आधीही मोरे यांनी तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे हे सोलापूर दौऱ्यावर आले असता गोकुळ शुगर कारखान्यावर त्यांनी या संदर्भात त्यांना निवेदन दिले होते. त्यामुळे ही सगळी परिस्थिती पाहता गावाला प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज आहे चपळगाव हे मोठं गाव आहे त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे चुंगी या गावाला देखील प्राथमिक आरोग्य केंद्र आहे परंतु केवळ रस्ते परिपूर्ण नाहीत आणि वेळेवर पोहोचता येत नाही अशावेळी एखादा पेशंट दगावू शकतो त्यामुळे धरणा लागत असलेल्या कुरनूर गावाला प्राथमिक आरोग्य केंद्र नाही त्यामुळे लवकरात लवकर प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पूर्ण गरजेचे आहे अशी अपेक्षा सावंत यांच्याकडे मोरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी आरोग्य मंत्री सकारात्मक असून लवकरात या संदर्भात निर्णय घेऊन निधी मंजूर करू असे आश्वासन दिले.