ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दुधनी येथे होलसेल किराणा दुकानाला भीषण आग ; आगीत लाखोंचे नुकसान

दुधनी दि. ०४ : दुधनी येथील भाजीपाला मार्केटमध्ये श्री बसव किराणा नावे होलसेल किराणा दोन मजली दुकान आहे. या दुकानाला रात्री दोन ते अडीच दरम्यान भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात आग लागल्याने दुकानातील सर्व साहित्य जाळून खाक झाली आहे. भीषण आगीमुळे लाखोंचे नुकसान झाले आहे. आग लागल्याचे कळताच खाली येण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने दुकान मालकसह आई, पत्नी आणि मुलाने वरच्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर उडी मारून जीव वाचवला. यामुळे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आगीत दुकानाचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भाजीपाला मार्केटमध्ये मल्लिनाथ चन्नबसप्पा मातोळी यांच्या मालकीच्या तीन मजली इमारत आहे. वरच्या मजल्यावर घर आहे तर खालच्या दोन मजली दुकान आहे. या दुकानाला शनिवारी पहाटे दोन ते अडीच दरम्यान सुमारास भीषण आग लागली. जेव्हा आग लागली होती तेव्हा घरातील सर्वजण गाढ झोपेत होते. जेव्हा आगीचे धूर वरच्या मजल्यावर पोचली तेव्हा त्याना खाली दुकानात आग लागली असल्याचे समजले. त्यानंतर आगीचे रौद्ररुप पाहून बाहेर येण्यासाठी रस्ता नसल्याने घरातील सर्वानी वरच्या मजल्यावरून घरासमोरील पत्र्यावर उडी मारून जीव वाचवला.

आग लागल्याची माहिती लगेच अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर दहा मिनिटांत अग्निशमन वाहन घटना स्थळी दाखल झाली. अग्निशमन गाडी घटना स्थळी पोहचण्या आधी परिसरातील नागरिकांनी तीन बोरवेलच्या माध्यमातून पाणी मारून आगीवर नियंत्रण आणले होते.

अग्निशमनच्या रिक्त पदे भरण्याची मागणी 

येथील नगर परिषदेकडे अग्निशमन वाहन उपलब्ध आहे. मात्र आगीवर नियंत्रण प्रशिक्षित कर्मचार्यांचा अभाव आहे. शहरात जेव्हा- जेव्हा आगीचे घटना घडतात तेव्हा सफाई कामगारांच्या मदतीने आगीवर नियंत्रण आणला जातो. येथील अग्निशमन दलासाठी वर्ग-३चे एक तर वर्ग-४चे चार असे एकूण पाच पदे मंजुर आहेत. मात्र शासनाकडून अद्याप ते भरण्यात आली नाही. यामुळे लवकरात लवकर रिक्त पदे भरण्यात यावी अशी मागणी व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!