अक्कलकोट,दि.४ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त खासदार डाॅ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी खासदार स्थानिक विकास निधीतून अक्कलकोट व दक्षिण सोलापूरातील सर्व शासकीय ग्रंथालयांना ऋषी बकीमचंद्र चटर्जी, राष्ट्रवाद ३६० अंशातून, ब्रह्मर्षी स्वामी विवेकानंद ते राजर्षी नरेंद्र मोदी या पुस्तकांचे संच डाॅ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते देण्यात आले. अक्कलकोट येथील श्रीमंत शहाजीराजे भोसले वाचनालय येथे हा कार्यक्रम पार पडला. जीवनाला सुगंध देण्यासाठी पुस्तके ही वाचलीच पाहिजेत वाचाल तर वाचाल असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
आनंदमठ या कादंबरीचे लेखक व वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचे कवी ऋषी बकिमचंद्र चटर्जी यांचे मराठीतील पहिले चरित्र ग्रंथ मिलिंद सबनीस यांनी लिहिले आहे. हा ग्रंथ सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल. या ग्रंथाचे वाटप केलेल्या ग्रंथांमध्ये समावेश आहे. विद्यार्थ्यांनी सतत वाचन केले पाहिजे वाचन संस्कृती वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना ग्रंथालयाने मोफत पुस्तकांची सोय करावी, असे डाॅ. भीमाशंकर बिराजदार यांनी सांगितले.
प्राथमिक स्वरूपात अक्कलकोट तालुक्यातील हसापूर, कोन्हाळी व दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग, तीर्थ, शिंगडगाव येथील वाचनालयांना पुुस्तके देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजय निकते यांनी केले.
या कार्यक्रमास अश्विनी चव्हाण, लक्ष्मण पाटील, अँड प्रशांत शहा, आरती काळे, पुष्पा हरवाळकर, किरण जाधव, ग्रंथपाल दत्तात्रय बाबर,दिनकर शिंपी,स्नेहा नरके, अश्विनी शिंपी, अपर्णा गुरव,माधवी जंगाले, श्रीशैल जडगे, गौरीशंकर दोड्याळे, आमसिद्ध निंबाळ, श्रीकांत श्रीगणी, संजय माणकोजी उपस्थित होते.आभार दिनकर शिंपी यांनी मानले.