शेतकऱ्यांच्या कांद्याला प्रती क्विंटल १ हजार रूपये अनुदान द्यावे ; राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने तहसीलदारांना निवेदन
अक्कलकोट दि . ०४ :राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय समाज पक्ष अक्कलकोट शहर व तालुका कार्यकारिणीच्यावतीने कांद्याला अनुदान द्यावे किंवा हमीभाव द्यावा या मागणीसाठी तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांना निवेदन देण्यात आले.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान म्हणून १ हजार रुपये तसेच प्रती क्विंटल ३ हजार रुपये हमीभाव देण्यात यावे,अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी तालुकाध्यक्ष दत्तात्रय माडकर, विधानसभा अध्यक्ष राजकुमार बिराजदार, विधानसभा संपर्क प्रमुख शिवानंद गाडेकर, तालुका उपाध्यक्ष पिंटू गावडे,तिपण्णा घोडके,विलास पाटील, काशिनाथ निंबाळ, सोमनाथ घोडके, विशाल निंबाळ,रेवणसिध्द शेरी,शंकर कोकरे, देवेंद्र नारायणकर,नागू शिरोळे, शिवलिंग गायकवाड यांच्यासह आदी उपस्थित होते.
यावर्षी राज्यामध्ये कांद्याचे उत्पादन चांगले झाले आहे त्यामुळे बाजारपेठेत आवक चांगली आहे. परंतु दुर्दैवाने शेतकऱ्यांचा कांदा मातीमोल भावाने विकला जात आहे. शेतकऱ्यांना कांदा पिकविण्यासाठी प्रती क्विंटल १५०० रूपये खर्च येतो परंतु आज बाजारात ३०० ते ५०० रूपये क्विंटल दराने विकला जात आहे यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी होणार आहे म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने ही मागणी करण्यात आल्याचे तालुकाध्यक्ष माडकर यांनी सांगितले.