संस्कार प्री स्कूलच्या लिटल चॅम्प टॅलेंट हंट स्पर्धेला प्रतिसाद ; ९२ विद्यार्थ्यांनी घडविला कलाविष्कार
अक्कलकोट, दि.४ : अक्कलकोट येथील संस्कार प्री स्कूलच्यावतीने लिटल चॅम्प टॅलेंट हंट स्पर्धेचे आयोजन लोकापुरे मल्टीपर्पज हॉल अक्कलकोट येथे करण्यात आले होते. या स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.लहान मुलांना स्टेज डेरिंग मिळावे तसेच सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे संस्थेचे प्रमुख डॉ. विपुल शहा यांनी सांगितले.
मागील दहा वर्षापासून या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती रूपाली शहा यांनी दिली.या स्पर्धेत कौशल्य गटातून स्पृहा मंथनाळ, फॅन्सी ड्रेस मध्ये सानवी खिलारी, डान्स स्पर्धेमध्ये श्रीजा नंदर्गी, फॅशन शोमध्ये मायरा महिंद्रकर, ऍक्टिव्ह चाईल्ड मध्ये अक्षरा राठी, बोल्ड चाइल्ड मध्ये श्रेयस मठपती, एक्टींगमध्ये आदिती करपट्टी, सिंगिंग मध्ये वेदांत मलगोंडा आदींनी यश मिळवले.या स्पर्धेचे पारितोषिक वितरण शांभवी कल्याणशेट्टी व मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून गायत्री पारखे, स्वाती हत्ते यांनी काम पाहिले. विजेत्या स्पर्धकांना फ्री स्कूलच्या वतीने रोख रक्कम, ट्रॉफी व सर्टिफिकेट देण्यात आले.
या स्पर्धेसाठी अडीच ते सहा वर्षांपर्यंतचे ९२ विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी डॉ.सुवर्णा मलगोंडा, राजूशेखर हिप्परगी,मिलन कल्याणशेट्टी, सागर कल्याणशेट्टी, डॉ.प्रमोद सुतार,सुवर्णा साखरे,वर्षा हिप्परगी, डॉ.प्रशांत वाली, सपना शहा यांच्यासह पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.