महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला मदत करणारा अर्थसंकल्प ; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया
मुंबई : छत्रपती शिवरायांच्या राज्यकारभार जसा अठरा पगड जाती डोळ्यासमोर ठेऊन केला जात होता त्याचाच आदर्श ठेऊन महाराष्ट्राच्या शिंदे-फडणवीस सरकारने २१ व्या शतकातील महाराष्ट्र कुठल्या दिशेला न्यावा व राज्य नंबर १ करण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.
हिंदहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा महाराष्ट्र पुढे नेण्याचे काम या अर्थसंकल्पातून करण्यात आले आहे, असे सांगून बावनकुळे म्हणाले, आजचा दिवस एतिहासिक असून महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला मदत करणारा हा अर्थसंकल्प असून विरोधकांची बोलती बंद करणारा हा अर्थसंकल्प आहे.
* चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्याच्या एकूण बजेटच्या ४० टक्के भाग शेतकऱ्यांच्या विकासासाठी आहे. सिंचन, जलयुक्त शिवार व महाराष्ट्राचा जीडीपी वाढणार आहे.
* संजय गांधी योजनेच्या लाभार्थी अनुदानात भरीव वाढ झाली, कोतवाल, शिक्षक, आशा सेविकांच्या मानधनात भरघोस वाढ झाली आहे.
* महाराष्ट्र ही संताची भूमी असून राज्याची संस्कृती व परंपरा जपण्याचे कामही अर्थसंकल्पातून झाले आहे.
* महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत उत्कृष्ठ अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. अर्थसंकल्पाची फलश्रुती समाजाच्या वंचित घटकांना मिळेल.
* अनेक महामंडळे निर्माण करून मागासवर्गीयांच्या उत्थानाचे काम होणार आहे. रामोशी समाज, धनगर समाजासाठी महामंडळे स्थापन करून विविध योजना राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला.
* महिलांसाठी अनेक योजना सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
* शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेतून ४० लाख शेतकऱ्यांपैकी १० लाख शेतकऱ्यांना हरीत ऊर्जा मिळणार आहे.
* यासोबतच शेतकऱ्यांना १ लाख कृषीपंप मिळेल. याचा फायदा ऊर्जा विभागालाही होईल. जलसंपदा विभागातून सिंचन होईल. विदर्भ मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्राचा फायदा होईल.
* मुंबईपासून संपूर्ण महाराष्ट्रातून शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन केले जात आहे. महाराष्ट्राला ऊभारी देणारा हा अर्थसंकल्प असून सर्वसमावेशक अर्थसंकल्पासाठी महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने अभिनंदन करतो, असेही बानकुळे म्हणाले.