दुधनी : येथील मातोश्री लक्ष्मीबाई म्हेत्रे प्रशाला व श्री. गुरुशांतलिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महिला दिनानिमित्त शाळेचे महिला पालकांना शाळेत आमंत्रित करून विविध मनोरंजनात्मक उपक्रम घेऊन यश मिळविलेल्या महिला पालकांना बक्षीस वाटप देखील देण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला पालक सपना कलशेट्टी व प्रमुख पाहुणे म्हणून कविता कोटनुर, सुनंदा मानकर, सुमित्रा म्हेत्रे, सुनिता म्हेत्रे, मधुमती सावळसुर, रुक्मिणी माळेकर, संगिता कुंभार, निकीता खंडाळ, शिवलीला खंडाळ, सैपनबी मुजावर, रेणुका धोत्रे, पूजा कुंभार ह्या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष व प्रमुख पाहुणे तसेच प्रशालेचे पर्यवेक्षक सिद्धाराम पाटील, उपप्राचार्य शंकर देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी शाळेतील शिक्षिका कलबुर्गे मॅडम व खंडाळ मॅडम यांच्या हस्ते सर्व महिला पालकांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
महिला दिनाचे औचित्य साधून काही विद्यार्थिनींनी समूह गीते, नृत्य आणि शाळा व महाविद्यालयील विद्यार्थीनींनी भाषणे केली. महिला पालक म्हणून सुनंदा मानकर यांनी आपल्या मनोगतातून स्त्रियांचे कर्तृत्व व कामगिरी बद्दल माहिती सांगितले. तर कावेरी खंडाळ यांनी स्त्रियांचे सध्याच्या जगातील स्थान आणि त्यांच्या किर्तीबद्दल माहिती सांगितले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षा सपना कलशेट्टी यांनी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शाळा व महाविद्यालयाचे शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी अर्पिता म्हेत्रे व कुमारी समरीन पठाण या विद्यार्थीनींनी केले तर आभार सौ. मरियनबानू कलबुर्गे मॅडम यांनी मानले.