अक्कलकोट, दि.९ : जागतिक महिला दिनाचे औचित्यसाधून सखी ग्रुप अक्कलकोटच्यावतीने कर्तृत्ववान नारी पुरस्कार प्रदान करण्यात आले. अक्कलकोट येथील टेनिस कोर्ट हॉलमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मंजुषा मेंथे या होत्या. डॉ.शिवलीला माळी, सुवर्णा साखरे, उषा छत्रे, रेखा तोरस्कर आदींची उपस्थिती होती.
प्रारंभी वृक्षाला पाणी घालून गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. समाजातील कर्तृत्ववान महिला ज्यांच्या घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झालेले आहे पण या महिलांनी न डगमगता परिस्थितीशी समर्थपणे दोन हात करून आपल्या संसाराचे कुटुंबीयाचे व मुलाबाळांचे संगोपन उत्तम रीतीने केलेले आहे अशा कर्तृत्ववान व कार्यतत्पर महिलांची निवड सखी ग्रुपने या पुरस्कारासाठी केली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मल्लम्मा पसारे यांनी केले.
यावेळी पद्मावती पंडित, सुवर्णा नारायणकर, रेणुका पुजारी, मंगल पवार, जयश्री बिंदगे , कांचन माढेकर, प्रमिला जाधव, पार्वती बलसुरे, तेजस्विनी पाटील, पूजा पोतदार आदी महिलांना कर्तृत्ववान नारी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व मायेची साडी असे पुरस्काराचे स्वरूप होते.
यावेळी डॉ.माळी यांचा विशेष सेवाभावी डॉक्टर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला.वेदिका हर्डीकर,शितल जिरोळे, लक्ष्मी अचलेर, आशा भगरे, रोहिणी फुलारी, प्रियंका किरणळी, माधवी धर्मसाले, वर्षा शिंदे डॉ.दीपमाला आडवीतोट, अनिता पाटील, रत्नमाला मचाले, रेशमा लांडगे, दीपाली लांडगे, विदया शाबादे, वैशाली लोकापुरे, निंगमा हिंडोळे, राजश्री साखरे, रेखा पाटील, बिराजदार, ऍड.के.एस हल्ले, ऍड.एच.डी बाके आदींसह अक्कलकोटमधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी बोराळकर व श्रद्धा मंगरुळे यांनी तर आभार सोनल जाजू यांनी मानले.