ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर ; शासकीय कामासाठी आलेल्या सामान्यांना मनस्ताप

मुंबई : जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. कर्मचाऱ्यांच्या या संपामुळं शिंदे-फडणवीस सरकारचे अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शिंदे-फडणवीस सरकारसोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्यानंतर कर्मचारी संपावर गेले असून त्याचा परिणाम आज दिसून आला आहे.

सरकारी कर्मचारी संपावर गेल्यामुळे राज्यातील प्रमुख शहरांतील सरकारी कार्यालयांमध्ये शुकशुकाट असल्याचं पाहायला मिळालं. यामुळे प्रशासकीय कार्यालयांमध्ये ओस पडलयांचे पाहायला मिळाली. त्यामुळं शासकीय कामासाठी आलेल्या सामान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्यास असमर्थता दर्शवली आहे. ही योजना आता लागू केली तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही, परंतु त्याचे विपरित परिणाम हे २०३० नंतर पाहायला मिळतील, असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं होतं. त्यानंतर कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत कर्मचारी संघटनांनी जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारशी चर्चा केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!