ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ज्यांना मार्केट कमिटी कळत नाही; त्यांनी ज्ञान पाजळु नये;शंकर म्हेत्रे यांचा विरोधकांना टोला

 

अक्कलकोट,दि.१६ : ज्यांना मार्केट
कमिटी म्हणजे काय हे आयुष्यभर कळले नाही.अशांनी चुकीच्या गोष्टी सांगुन मतदारांची दिशाभूल करू नये.चुकीचे ज्ञान हे घातक असुन ते इतरांना पाजळु नये,असा टोला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांनी विरोधकांना लगावला आहे.
अक्कलकोट व दुधनी मार्केट कमिटीच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध चांगलेच रंगले आहे.शुक्रवारी,
तालुकाध्यक्ष म्हेत्रे यांनी विरोधकांवर टीका केली होती.यानंतर दुधनीचे भाजप शहराध्यक्ष अप्पु परमशेट्टी यांनी देखील दुधनीची मार्केट कमिटी ही म्हेत्रेंची प्रायवेट कंपनी झाल्याचा आरोप केला होता.याला उत्तर देताना म्हेत्रे म्हणाले की,मार्केट कमिटी म्हणजे शेतकऱ्यांचे मंदिर आहे.दुधनी व नागणसुर मार्केट कमिटीची निर्मीती ही तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सोयीची ठरली आहे.याउलट विरोधकांनी अक्कलकोटच्या मार्केट कमिटीची दुरावस्था केली आहे.मोठा भ्रष्टाचार झाला असुन याचे पुरावे मतदारांसमोर आणणार आहे.
परमशेट्टी यांना मार्केट कमिटीच्या आवारातील व्यवहार,प्रक्रिया याबाबतीत ते अज्ञानी आहे.त्यांचे बोलणे म्हणजे जगातील आठवे आश्चर्य असल्याचा घणाघात म्हेत्रे
यांनी केला.दरम्यान माजी आमदार सिद्रामप्पा पाटील व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वांगीण विकासासाठी व शेतकरी, व्यापारी यांच्या उन्नतीकरिता भारतीय जनता पक्ष कटीबद्द असून दुधनी बाजार समितीतील कारभाराच्या एकाधिकारशाहीला छेद देण्यासाठी ही निवडणुक लढविली जात आहे. याकरिता शेतकरी व व्यापार्‍यांनी साथ देण्याचे आवाहन भाजपा दुधनी शहर अध्यक्ष अप्पू परमशेट्टी यांनी यासंदर्भात बोलताना म्हटले आहे.अक्कलकोटपासून दुधनी बाजार समिती वेगळी करुन सत्ताधार्‍यांनी व्यापारी, शेतकरी, हमाल, तोलार यांच्या हितार्थ कामे न करता समितीच्या माध्यमातून स्वविकासाला प्राधान्य देण्याचे काम सत्ताधार्‍यांनी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दुधनीचे बिनविरोध मग
अक्कलकोटचे का नाही

व्यापार,शेतकरी,हमाल-तोलार आदींचे हित न साधता म्हेत्रे यांनी स्वतःचे हित साधल्याचा आरोप केला होता.दुधनीत
आम्ही सर्वांचेच हित जोपासतो.म्हणुनच व्यापाऱ्यांनी त्या जागा बिनविरोध केल्या.अक्कलकोटला व्यापारी नाराज आहेत म्हणून तिथे निवडणूकीसाठी अर्ज केले आहेत.दुधनी बिनविरोध मग अक्कलकोटचे व्यापारी बिनविरोध का केले नसावेत ? या प्रश्नाचे उत्तर विरोधकांनी द्यावे,
असे प्रति आव्हान म्हेत्रे यांनी दिले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!