कुरनूर दि. १७ रक्तदान हे श्रेष्ठदान आहे त्यामुळे आपल्यामुळे कुणाचा तरी जीव वाचू शकतो की भावना मनामध्ये ठेवून रक्तदान करावे असे प्रतिपादन हिरेजेवर्गी मठाचे मठाधीपती श्री. ष.ब्र. जयगुरूशांतलिंगाराध्य महास्वामीजी यांनी केले. ते दुधनी येथे अक्षय तृतीया व महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त श्री बसव प्रतिष्ठान दुधनी यांच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलत होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतीमा पूजन व दीपप्रज्वलन जयगुरूशांतलिंगाराध्या महास्वामी यांच्या हस्ते करून स्वामीजिंच्या रक्तदानाने करण्यात आले.यावेळी हेडगेवार रक्त पेढीचे जनसंपर्क अधिकारी दिलीप बनसोडे, डॉ. सुशील वाघमारे, प्रकाश कोंडा, सुनील हरारे, अमृता चव्हाण, बसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष मल्लिनाथ येगदी, उपाध्यक्ष उमेश सावळसुर, भीमाशंकर अल्लापुर, अनंत कासार, चंद्रशेखर खंडाळ, संतोष जोगदे, विश्वनाथ गंगावती, मल्लिनाथ मातोळी, इरय्या पुराणिक, अंबण्णा निंबाळ, दौलत हौदे, संजय नुला, प्रशांत पादी, शांतलिंग परमशेट्टी, संगीता मेंथे, राहुल म्हस्के, पार्वती कोळी, बसवराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. या रक्तदान शिबिरात १७६ रक्तदात्यानी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे रक्त संकलन हेडगेवार रक्त पेढीने केले. पुढे बोलताना महात्मा बसवेश्वरानी समाजातील गरिबी विषमता दूर करून आर्थिक समृद्धता निर्माण केली असेही ते म्हणाले. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी शांतलिंग वागदरी, दत्तात्रय पोतदार, गुरुशांत वडेयार, सातलिंग अल्लापुर, बसवराज मालगत्ती, दौलत भांजी, महेश माळगे, सैदप्पा जानकर, गोलु ठक्का, राजशेखर परमशेट्टी, सिद्धाराम कण्णी, चंद्रशेखर माशाळ, शुभम मातोळी, बसवराज मिरकल, अनिल भाविकट्टी, शरण येगदी, विशाल खंडाळ, विनोद झुलपे, भागेश यळसंगीसह समस्त बसव भक्तांनी परिश्रम घेतले.
मुस्लिम बांधवांकडून माणुसकीचे दर्शन…!
रमजान महिन्याचा रोजे सुरू असताना देखील मुस्लिम समाजातील समाज बांधवांनी रक्तदान करून एकतेचा संदेश दिला. दुधनी मुस्लिम युवक समाज बांधवांनी रक्तदाना बरोबर पिण्यासाठी पाण्याची बाटल्याची व्यवस्था देखील करून दिली. यामध्ये जिलानी नाकेदार (मुस्लिम समाज अध्यक्ष दुधनी) हमीद बडेखा, हबिब बळूरगी, महेदीमिया जिडगे, मेहराजहसन जिडगे, आजम शेखजी, युसुफ शेख, नजीम बळूरगी, इस्माईल गुलबर्गा या तरुनांचा समावेश होता.