अक्कलकोट ,दि.२६ : मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या अभिनव उपक्रम उपक्रमाची सुरुवात ग्रामीण भागात झाली असून शुक्रवारी किणी मंडळातील कुरनूर
येथे हा उपक्रम घेण्यात आला.याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.जिल्हा परिषद शाळा कुरनूर ( ता. अक्कलकोट ) येथे नायब तहसीलदार विकास पवार,सरपंच व्यंकट मोरे व उपसरपंच आयुब तांबोळी व अन्य मान्यवरांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी प्रतिमा पूजन सरपंच मोरे व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना नायब तहसीलदार विकास पवार म्हणाले की,शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत विविध शासनाच्या योजनाची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी शासनाचे काम चालू असून लोकांना घर बसल्या विविध
दाखला व योजनेचे माहिती देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील प्रत्येक घटकाला शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा सर्व नागरिकांनी जरूर लाभ घ्यावा,असे आवाहन केले.पंचायत समिती,जिल्हा परिषद आणि ग्रामपचायत स्तरावरील विविध योजना, ग्रामपंचायत विविध दाखले ऑनलाईन कसे काढायचे यांची सर्व माहिती या अभियानामार्फत सर्वसामान्य नागरिकांना मिळत आहे,असे सरपंच मोरे यांनी सांगितले.यावेळी मंडल अधिकारी एस.सी जमादार, तलाठी व्ही.आर चोरमले ,जी.डी बजाज, जी.एस घाटे,व्ही.एस पवार, आकाश घंटे, सुनील मुलगे ,प्रवीण बाबर, दाऊद चुंगीकर, एफ. एम शेख, ग्रामसेवक
मारुती सुरवसे, विस्तार अधिकारी एस.बी कोळी,परशुराम बेडगे,अजयकुमार शिंदे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी,आशा
वर्कर आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.