दुधनी दि. २७ : महाराष्ट्र व कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या दुधनीजवळील रेल्वे उड्डाणपुलाचे काम मागील अनेक वर्षांपासून रखडले आहे. यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहन धारकाना मोठा मनस्थाप सहन करांव लागत आहे. यातून सुटका मिळविण्यासाठी रेल्वे उड्डाण पूलाच्या कामाला त्वरित सुरुवात होणे गरजेचे आहे. यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी पुढाकार घ्यावे, असे आवाहन दुधनी विरक्त मठाचे मठाधिपती डॉ. शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांनी केले. ते एका कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
दुधनी येथील हानगल्ल गुरूकुमारेश्वर फायनान्सच्यावतीने दुधनी शहर भाजपचे अध्यक्ष सातलिंगप्पा उर्फ अप्पू परमशेट्टी यांची दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी, भाजपचे माजी नगरसेवक महेश पाटील यांची श्री स्वामीसमर्थ साखर कारखानेच्या संचालकपदी व आडत व्यापारी गटातून चंद्रकांत येगदी आणि सातलिंग परमशेट्टी यांची संचालक म्हणून बिनविरोध झाल्याबद्दल फेटाबांधून डॉ. शांतलिंगेश्वर महा स्वामीजी यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात श्री हानगल्ल गुरूकुमारेश्वर व लिं. शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी मंचावर दुधनी नगर परिषदेचे माजी नगसेवक शिवानंद माड्याळ, सिद्धराम येगदी, अतुल मेळकुंदे, बसवराज मगी यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना स्वामीजी म्हणाले की, दुधनी शहर हा सोलापूर – गुलबर्गा या दोन जिल्ह्यांना जोडणारा महाद्वार आहे. या महामार्गावरून रोज हजारो गाडया धावतात. सदया रेल्वेचे दुहेरीकरणाचे काम पूर्ण होऊन रेल्वे गाड्यांची वाहतूक वाढली आहे. रेल्वेच्या सततच्या ये – जा मुळे हे फाटक दर एक तासात पाच ते सहा वेळा बंद करावा लागतो. सरासरी २४ तासामध्ये १२ तास तर गेट बंदच असतो. यामुळे सतत वाहतुकीची कोंडी होवून जड वाहनासह इतर वाहनांच्या फाटकाच्या दोन्ही बाजुला रांगा लागलेली असतात. यामुळे इंधनासह या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची वेळ वाया जात आहे. यासाठी रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुल बांधून वाहतुकीची कोंडी सोडवावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी पुढाकार घेऊन काम लवकरात लवकर सुरू होण्यासाठी प्रयत्न करावे असे, आवाहन त्यांनी केले.
यावेळी इरय्या पुराणिक, शिवराया अल्लापुर, शंकर भांजी, महानिंगय्या बाहेरमठ,गुरुपादय्या सालीमठ, शिवानंद बिंजगेरी, शरणबसप्पा शिलवंत, जगदीश हौदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन शांतेश धोडमनी यांनी तर आभार सुगुरेश बाहेरमठ मानले.