अक्कलकोट : काल मातोश्री निलव्वाबाई खेड़गी शिशु, प्राथमिक आणि माध्यमिक प्रशालेत आषाढ़ी एकादशी निम्मीत दिंडी आणि रिंगण सोहळ्याचे आयोजन केले गेले. या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी अक्षरशः भक्तीचा मळा फुलला. या रिंगण सोहळ्याने शिक्षकांसह पालकांचे लक्ष वेधून घेतले. दरवर्षी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर खेडगी शिक्षण समूहाच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन केले जाते. महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे
ही परंपरा जोपासण्यासाठी आणि त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजण्यासाठी दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन केले जाते, असे अक्कलकोट एजुकेशन सोसायटीचे चेअरमन बसालिंगप्पा खेड़गी यांनी सांगितले. त्यांच्या हस्तेच पांडुरंग आणि रुक्मिणी मातेची पुजा करण्यात आली.याप्रसंगी प्रशालेतील विद्यार्थ्यानीं रिंगण सोहळा आणि दिंडीतील विविध खेळाचे प्रात्यशिके दाखवली.याप्रसंगी चेअरमन खेडगी यांनी विद्यार्थ्यांच्या कलेचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक जयदीप साखरे आदींसह शिक्षक, पालक ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.