अक्कलकोट : आषाढी एकादशी निमित्त
मैंदर्गी कन्नड मुली शाळेत विठोबाच्या पालखीची मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. मैंदर्गीच्या मुख्य रस्त्यातून व गल्लीतून पालखी घेऊन गावातील सर्वांना विठुरायाचे दर्शन घडविण्यात आले.या पालखीच्या मिरवणुकीवेळी वाद्य वृंद सहभागी झाले होते.
यावेळी विठ्ठल रुक्मिणीच्या रूपात शाळेतील मुलां- मुलींना वेशभूषा करण्यात आली होती.
शाळेतील सर्व मुली हातात झेंडे,डोक्यावर तुळशीचा कळस घेऊन मुली हसत खेळत फुगडी खेळत गावातून मिरवणूक काढली. यावेळी गावातील नागरिक माता पालक सर्वांनी विठुरायाच्या पालखी समोर पाणी घालून नारळ फोडून दर्शन घेत होते. पूर्ण गावाला पंढरीचे स्वरूप आले होते. अवघी मैंदर्गी विठुरायाच्या गजराने दुमदुमले होती. मिरवणुकीच्यावेळी गावकऱ्यांनी मुलींना ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती.यावेळी नागरिक चॉकलेट,बिस्कीट व केळी मुलींना देत होते.
मिरवणूक झाल्यानंतर मुलींना प्रसाद म्हणून शाळेत खीर देण्यात आले. या कार्यक्रमात गावकरी शाळा व्यवस्थापन समिती माता पालक सर्वांनी भाग घेतले होते.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश पाटील, बसवराज हिप्परगी यांनी सहकार्य केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सुरेखा मसूती, गीता शिवणगी, विजया नाडगवडा, विजयालक्ष्मी भैरामडगी, गुरनिंगप्पा शिवणगी, रमेश जुजगार, सीमा हिरतोट,सुप्रिया बिराजदार आदींनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांनी केले होते.मिरवणुकीचा शेवट सर्व गावकऱ्यांचे आभार मानून करण्यात आला.