ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिस्त,संस्कार,शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास : पटेल;नागनहळळी आश्रमशाळेत सेमी वर्गाचे उदघाटन

 

अक्कलकोट, दि.१८ : शिस्त, संस्कार व शिक्षण या त्रिसुत्रीचा अवलंब करुन वंचित विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम या
संस्थेमार्फत सुरू आहे,असे प्रतिपादन संस्थेचे प्रमुख जावेद पटेल यांनी केले.तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा नागनहळळी येथे शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ पासून इयत्ता ५ वी व ८ वी सेमी वर्गाचे उदघाटन करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.प्रमुख पाहुणे म्हणून मंगरुळे प्रशाला अक्कलकोटचे माजी मुख्याध्यापक गिरीश पटटद व शारदामाता इंग्लिश मिडीयम हायस्कूल अक्कलकोट येथील संगणक विभाग प्रमुख सोनल जाजू, प्राचार्य आय.एम.मुजावर व मुख्याध्यापक आर.जी. शेख उपस्थित होते. जावेद पटेल यांनी नेहमी सामाजिक बांधिलकीतुन या संस्थेची प्रगती केली आहे. असे गौरवगादगार पटटद यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. याबरोबरच विज्ञान व गणित हे विषय इंग्रजी माध्यमातून आहेत त्याची भिती काढून टाकून चांगला अभ्यास करुन आपली प्रगती करावी,असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. जाजू यांनी दैनदिन जीवनात संगणक साक्षरता व वापर याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. प्राचार्य मुजावर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शंभुलिंग बशेटटी,बसवराज बिराजदार, रुद्राक्ष वैरागकर,संजय कवटगी, गुरप्पा लिंबीतोटे, बदिउजमा पटेल,प्रशांत राचटटे यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन मोहन गुरव यांनी तर आभार प्रकाश
सोनटक्के यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!