ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी समर्थनगरमध्ये २५ बाकड्यांची सोय;ग्रा. पं. सदस्य मोनेश्वर नरेगल यांचा उपक्रम
अक्कलकोट, दि.३ : अक्कलकोट शहरालगत असलेल्या समर्थनगर ग्रामपंचायतीचे सदस्य मोनेश्वर नरेगल
यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत दिलेल्या शब्दाप्रमाणे ग्रामस्थांच्या सोईकरिता ठिकठिकाणी २५ सिमेंट विश्रांती
बाकडे दिले आहेत. त्यामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे. स्वखर्चातून त्यांनी हे कार्य केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक
होत आहे.नरेगल हे ग्रामपंचायत सदस्य होवून चार वर्ष झाले आहेत.मागच्या चार वर्षात त्यांनी वृक्षारोपण,गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप इत्यादी कार्यक्रम राबवून दिलासा देण्याचे काम केले आहे.आपला वाढदिवस देखील ते अनावश्यक खर्चाला फाटा देवून साजरा करत असतात.नरेगल
यांनी आता पर्यंत केवळ आपल्या वार्डापुरते न विचार करता समर्थनगर उपनगरातील आबावाडी, जेऊर रोड, समता नगर, गुरुमित्र सोसायटी, बॅगेहळ्ळी रोड दत्त मंदिर, स्वागत नगर, राजे प्रतिष्ठान आदीसह विविध ठिकाणी असे उपक्रम राबवून त्यांनी कौतुकस्पद कार्य केल्याचे सतीश खराडे यांनी सांगितले. ग्रामस्थांना मी निवडून आल्यावर शब्द दिल होतो तो शब्द पाळण्याचा प्रयत्न मी सातत्याने करतो यापुढेही ते करत राहणार, असे ग्रामपंचायत सदस्य नरेगल यांनी सांगितले. यावेळी उदय नगरेगल,सतिश खराडे, गोपाल खराडे, किरण चव्हाण,श्रीनिवास दळवी, प्रसाद साठे, संदीप बिराजदार,सचिन पवार,अनिल बणजगोळ, समर्थ घाटगे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.