अक्कलकोट : ओम नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि परिवर्तिनी स्मार्त एकादशी निमित्त रविवारी सायंकाळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ व न्यासाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचे सामुदायिक श्रीगणेश अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम मंडळ परिसरातील श्री शमी विघ्नेश् गणेश मंदिरा समोर शेकडो महिलांच्या मुखातून उमटलेल्या अथर्वशीर्ष पठणाच्या या सामूहिक स्वरांनी वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते.
गणेश नामाचा जयघोष करीत महिलांनी सायंकाळच्या मंगल समयी प्रसन्नतेची अनुभूती दिली. अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे यंदा दुसऱ्या वर्षी महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. पारंपरिक पेहरावातील महिलां सायंकाळी अथर्वशीर्ष पठणासा उत्सव मंडपासमोर गर्दी केली होती. महिलांनी ॐकार जप आणि मुख्य अथर्वशीर्ष पठन करीत गणरायाला नमन
केले.
दरम्यान या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन समाधी मठाचे पुरोहित धनंजय पुजारी, तृप्ती पुजारी, कु.ऋषी पुजारी, संस्थापिका अध्यक्षा अलकाताई भोसले, सचिवा अर्पिताराजे भोसले, न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानाचे विश्वस्त उज्वलाताई सरदेशमुख, सचिव शामराव मोरे, विश्वस्त राजेंद्र लिंबीतोटे, माजी नगराध्यक्षा अनिताताई खोबरे, प्राचार्य नागनाथ जेऊरे, अभिनंदन गांधी, अरविंद शिंदे, रुपाली रामदासी, मल्लम्मा पसारे, सुनंदा पत्रिके, राजश्री कलशेट्टी, सौरभ मोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी समाधी मठाचे पुरोहित धनंजय पुजारी यांनी मनोगत व्यक्त केले.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या उपस्थितीत व न्यासाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापिका अध्यक्षा अलकाताई भोसले यांच्या नेतृत्वाखाली महिलांचे सामुदायिक श्रीगणेश अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम भक्तिमय व उत्साही वातावरणात संपन्न झाला. दरम्यान श्री गणेश उत्सवानिमित्त आयोजित श्री गणेश अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचा प्रारंभ ‘श्रीं’च्या नित्यपूजनाने झाला. श्रींचे पूजन समाधी मठाचे पुरोहित धनंजय पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले.
अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रमात परिसरातील मुली, महिला आदींसह अधिक ४०० भाविक सहभागी झाले होते. अथर्वशीर्ष पठणानंतर समाधी मठाचे पुरोहित धनंजय पुजारी व जमलेल्या भाविकांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. कार्यक्रमाचे न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी यांनी केले. मंत्रोच्चापरात सोहळा पार पडताना भक्तिमय वातावरण बनले होते. नावे नोंदविलेल्या महिलांना अथर्वशीर्ष पोथी मंडळाकडून देण्यात आली. कार्यक्रमास आलेल्या सर्व महिलांना प्रसाद देण्यात आला.
यावेळी वैशाली लिंबीतोटे, सरोजनी मोरे, कु.वैष्णवी पुजारी, रत्नमाला मचाले, आशा पाटील, स्मिता कदम, अंजना पवार, पल्लवी कदम, पल्लवी नवले, क्रांती वाकडे, कविता वाकडे, राजश्री माने, छाया पवार, आशा कदम, रूपा पवार, सुवर्णा घाडगे, तृप्ती बाबर, सोनाली मोरे, मंगला पाटील, वनिता पाटील, नंदा पाटील, राजेश्री पाटील, स्वामी निकम, ज्योती कदम, स्वपना माने, अवंती फडतरे, विमल पोमाजी व ग्रुप वागदरी, प्रिती रणसुभे, प्रमिला वाघमोरे, शैला स्वामी, गीतांजली स्वामी, कु. कुसुम स्वामी, शारदा कुंभार, सुनंदा अष्टगी, सांगवी ग्रुपच्या देवकर, ऐश्वर्या मलगोंडा, रूपा मलगोंडा यांच्यासह आदिजन उपस्थित होते.
कार्यक्रमास न्यासाचे विश्वस्त संतोष भोसले, सिध्देश्वर मोरे, अप्पा हंचाटे, बाबुशा महिंद्रकर, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, पुरोहित संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी, निखिल पाटील, रोहित खोबरे, दत्ता माने, राजू पवार, रमेश हेगडे, प्रसाद हुल्ले, मुन्ना कोल्हे, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, धानप्पा उमदी, नामा भोसले, सुमित कल्याणी, संभाजीराव पवार, पिंटू साठे, बाळासाहेब घाडगे, गणेश पाटील, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे, राजेंद्र काटकर, संतोष श्रीमान, विनय भोसले यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले.