---Advertisement---

मंगळवारी गोकुळ शुगरचा ९ वा बॉयलर अग्निप्रदिपन सोहळा ; चेअरमन दत्ता शिंदे यांची माहिती

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.२४ : धोत्री (ता.दक्षिण सोलापूर) येथील गोकुळ शुगर इंडस्ट्रीजचा ९ वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा मंगळवार दि.२६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती चेअरमन दत्ता शिंदे यांनी दिली. हा सोहळा आमदार सचिन कल्याणशेट्टी व शांभवी कल्याणशेट्टी यांच्या हस्ते होणार आहे.या कार्यक्रमास उद्योजक शहाजी पवार,गोकुळ शुगरचे संस्थापक बलभीम शिंदे,श्री तुळजाभवानी शेतकरी साखर कारखान्याचे चेअरमन सुनील चव्हाण यांच्यासह व्हाईस चेअरमन विशाल शिंदे,मॅनेजिंग डायरेक्टर कपिल शिंदे,एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर प्रदीप पवार,सीनियर मॅनेजर बालाजी पाटील,
वर्क्स मॅनेजर राजकुमार लवटे, शेती अधिकारी फक्रुद्दीन जहागीरदार, प्रोसेस मॅनेजर एस.पी भावसार आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.तरी या कार्यक्रमास ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन चेअरमन दत्ता शिंदे यांनी केले आहे. गेल्या वर्षी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना उस बीले वेळेत देऊन कारखान्याने गाळप हंगाम यशस्वी केला.त्याच पद्धतीने यावर्षी देखील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गोकुळ शुगरला ऊस घालून सहकार्य करावे. शेतकऱ्यांच्या पाठीशी हा कारखाना नेहमी राहील, असे शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!