अक्कलकोट, दि.२६ : चपळगावचे दिवंगत सरपंच स्वर्गीय संतोष पाटील यांचे योगदान गावासाठी अतिशय मोलाचे होते.त्यांना अभिवादन करण्यासाठी गेल्या २१ वर्षांपासून मित्र मंडळातर्फे हा रक्तदानाचा उपक्रम सुरू आहे याचा आदर्श सर्वांनी घेण्याचे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.मंगळवारी,चपळगाव (ता.अक्कलकोट)
येथील सरपंच स्व. संतोष पाटील यांच्या २१ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.या शिबिरात १११ जणांनी रक्तदान केले.याप्रसंगी
महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे माजी चेअरमन नंदकुमार पाटील होते.यावेळी जेष्ठ नेते सिध्देश्वर कल्याणशेट्टी,भाजप तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, सरपंच उमेश पाटील,उपसभापती अप्पासाहेब पाटील,महेश पाटील,मोहन चव्हाण,सिध्दाराम भंडारकवठे,बसवराज बाणेगांव,अभिजीत पाटील,तंटामुक्त अध्यक्ष गंगाधर कांबळे,दिपक पाटील,महादेव वाले,रमेश भंगे,गणेश कोळी,मनोज इंगुले,महेश गजधाने,बसवराज पाटील,प्रकाश बुगडे,कुमारप्पा दुलंगे,शरणु नागणसुरे,महेश पाटील,अंबणप्पा भंगे,ओमराज बाणेगाव,मच्छिंद्र सुरवसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्व.संतोष पाटील व दिवंगत आमदार मरहुम इनायतल्ली पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच उमेश पाटील यांनी केले.पुण्यतिथीच्या निमित्ताने दरवर्षी विधायक कार्यक्रम राबविण्याचा उद्देश त्यांनी सांगितले.यापुढील काळातदेखील सामाजिक बांधिलकीतुन विविध कार्यक्रम राबविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.रक्तदान केलेल्या प्रत्येक रक्तदात्यास संतोष पाटील मित्र मंडळाच्यावतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील सर्व तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.रक्तदान शिबीरासाठी आश्विनी ब्लड बँकेचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर कदम यांनी केले तर आभार सुरेश सुरवसे यांनी मानले.