ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मातोश्री लक्ष्मी शुगर पहिली उचल २५०० रुपये देणार : म्हेत्रे;अकराव्या गळीत हंगामाचा शुभारंभ

 

अक्कलकोट,दि.२५ : रुद्देवाडी ( ता.अक्कलकोट) येथील मातोश्री लक्ष्मी शुगर पहिला हप्ता २५०० चा देणार
असल्याची माहिती चेअरमन तथा माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी दिली.कारखान्याचा अकरावा गळीत हंगाम शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.त्यावेळी ते
बोलत होते.पहिली उचल २५०० रुपये जाहीर करीत असून अंतिम दर शेजारील कारखान्याचे दराप्रमाणेच देणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.याप्रसंगी मॅनेजिंग डायरेक्टर शिवराज म्हेत्रे,शितल म्हेत्रे, राजकुमार लकाबशेट्टी, दामाजीपंत बोकडे, इरण्णा करवीर व तालुक्यातील विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून अतिशय आनंदमय वातावरणात संपन्न झाला. अध्यक्षीय भाषणात कारखान्याचे चेअरमन सिध्दाराम म्हेत्रे यांनी चालू गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या ऊसाला पहिली उचल म्हणून २५०० रुपये प्रतिटन दर देणार असल्याचे जाहीर केले. यंदा पाऊस कमी असल्यामुळे ऊसाचा तुटवडा असल्यामुळे
कमी कालावधीत अधिक गाळप करण्याच्या दृष्टिकोनातून कारखाना व्यवस्थापनाने नियोजनबध्द आखणी केली असून
कारखाना गाळपास सज्ज असल्याचे सांगितले.चालू गाळप हंगामात ६ लाख मे.टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्टय
असून त्यादृष्टिने आवश्यक असणारी यंत्रणा उभी केली असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच दीपावली सणानिमित्त सभासद व ऊसपुरवठादार शेतकरी बाधंवाकरीता २० किलो साखर २० रूपये प्रति किलो या दराने वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे सर्व कर्मचा-यांची दीपावली
गोड करणेकरीता बोनस जाहिर केला.
कारखान्याच्या विकास वाटचालीत तालुक्यातील शेतकरी व कर्मचारी यांचा मोलाचा वाटा असून त्यांनी आपला ऊस कारखान्याला गाळपास देऊन सहकार्य करण्याचे आवाहन म्हेत्रे यांनी केले.यावेळी कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर बाळासाहेब कुटे, जनरल मॅनेजर रावसाहेब गदादे, कृष्णा एकतपुरे,केन हेड गुरुनाथ लोहार,सिद्राम गुरव,शिवपुत्र माशेट्टी,ऊसविकास अधिकारी बाबुराव पाटील,परमेश्वर फुलमाळी,चिफ अर्कोटट अंबादास बल्ला,मॅनेजर मिलिंद शिरसे,परचेस ऑफीसर सचिन कुलकर्णी, आय.टी.मॅनेजर सोमशंकर कलमणी,श्रीकांत लोहार,शिवानंद निंबाळ,विश्वनाथ हडलगी,सर्व अधिकारी,खातेप्रमुख,कर्मचारी व अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी बाधंवाची मोठी उपस्थिती होती.

२६५ उत्पादकांना वाऱ्यावर
सोडले नाही

या परिसरात पाण्याची दुर्भिक्षता असल्याने बहुतांश शेतकरी २६५ जातीच्या ऊसाची लागवड करतात.हा ऊस कारखान्याच्या रिकव्हरीसाठी घातक ठरतो.परंतु शेतकरी अडचणीत येऊ नयेत म्हणून कारखान्याच्या निर्मितीपासून आम्ही त्यांना वाऱ्यावर सोडले नाही.मागील वर्षी रिकव्हरी न बसल्याने वेळेत बिले अदा करण्यात अडचणी आल्या.मात्र आता अडचण नाही.

सिध्दाराम म्हेत्रे,चेअरमन

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!