डॉ.सुमा मलगोंडा यांची जपानच्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड; ब्रेस्ट कॅन्सरवरील संशोधनाचे होणार सादरीकरण
अक्कलकोट,दि.३ : डॉ.सुमा मलगोंडा या ऑन्कोलॉजीच्या क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी करत असून त्यांना जपान येथे होणाऱ्या ६१ व्या वार्षिक सभेच्या संयोगाने आशियाई ऑन्कोलॉजी सोसायटीच्या (AOS 2023 ) परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यास संधी मिळणार आहे.ब्रेस्ट कॅन्सर या क्षेत्रामध्ये त्यांनी वेगळे संशोधन केले असून त्याचे सादरीकरण या परिषदेमध्ये होणार आहे.डॉ.मलगोंडा ह्या सध्या भुवनेश्वर येथे मेडिकल ऑन्कोलॉजी करत आहेत.या दरम्यान त्यांनी अनेक पेशंटचा या विषयावर अभ्यास केला आणि सर्व्हे देखील केला आणि त्यात पिक थ्री सीए म्युटेशन अॅनालिसिस इन ब्रेस्ट कॅन्सर पेशंट्स या विषयावर पेपर तयार करून एक वेगळे संशोधन समोर त्यांनी आणले आहे.या संशोधनाची दखल जपान सरकारने घेतली असून त्यांना आता आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये आहे अभ्यास सादर करण्याची संधी उपलब्ध होणार आहे त्या भारताचे प्रतिनिधी म्हणून तिथे जाणार आहेत.ब्रेस्ट कॅन्सर नेमका कशामुळे होतो, तो अनुवंशिक आहे का आणि असेल तर त्यावरचे उपाय
काय आहेत, याचा सविस्तर अभ्यास या संशोधनामध्ये करण्यात आला आहे.रोज नवनवीन तंत्रज्ञान पुढे येत आहे ब्रेस्ट कॅन्सर ही अलीकडच्या काळात समस्या वाढत चाललेली आहे यामध्ये रोज नवनवीन संशोधन देखील पुढे येत आहेत त्याचाच भाग म्हणून या क्षेत्रामध्ये वेगळे काहीतरी करण्याचा माझा मानस होता.त्यामुळे हे कार्य सुरू केले आहे,असे डॉ.सुमा मलगोंडा यांनी सांगितले.खरे तर स्तनाच्या
कर्करोगाविरुद्ध भारताचा खूप मोठा लढा सुरू आहे त्या लढाईत या संशोधनाने एक आशादायक शक्ती निर्माण झाली आहे असे म्हणायला हरकत नाही,असे प्रख्यात स्त्री रोग तज्ञ डॉ.सुवर्णा मलगोंडा यांनी सांगितले.