---Advertisement---

मराठा आरक्षणाचा निर्णय लवकर घ्यावा – खा. डॉ.जयसिध्देश्वर महास्वामीजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले निवेदन

Follow Us:
---Advertisement---

 

सोलापूर – मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्यभरात तीव्रपणे होत असलेली मागणी लक्षात घेता लवकरात लवकर याबाबत उचीत निर्णय घेण्याची मागणीचे निवेदन खा.डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामीजींनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

मंगळवारी मुंबईत भेट घेत याबाबत निवेदनाद्वारे मागणी केली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा बांधवांनी मागणी करत आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये राज्यातील अनेक जिल्हयांमध्ये उपोषने तसेच इतर लोकशाही पध्दतीने आंदोलने सुरू आहेत. राज्यशासनाने या विषयाकडे गांर्भीयपूर्वक लक्ष दिले आहे. मराठा समाजाने सुरू केलेले हे आंदोलन गाव पातळीपर्यंत पाहेचले आहे.

यासर्व परिस्थीची व घडणाऱ्या घटनांची दखल राज्य सरकारने घेतली आहेच. तरी एक लोक प्रतिनिधी म्हणून मराठा समाज बांधवांच्या भावना लक्षात घेता आपण या प्रकरणी लवकरात लवकर उचित निर्णय घेण्याची विनंती खा.डॉ.जयसिध्देश्वर महास्वामीजी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!