मुंबई : वृत्तसंस्था
देशात वाढत्या महागाई सुरु असतांना आता लग्नाच्या पूर्वीच लग्न करणाऱ्या मंडळीना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. सध्या सोने-चांदीच्या किंमतींनी कहर केला असून भाव वधारले आहेत. त्यामुळे ग्राहकांचा हिरमोड झाला आहे. दिवाळीपासून मौल्यवान धातूंची आगेकूच सुरु आहे. धनत्रयोदशी आणि पाडव्याला मोठी दरवाढ झाली होती. त्यानंतरच्या प्रत्येक आठवड्यात सोने-चांदीने आलेख चढताच ठेवला. ऑक्टोबर महिन्यातील हमास-इस्त्राईल युद्धामुळे दोन्ही धातूंच्या किंमती भडकल्या. आता या मे महिन्यातील सोने-चांदीचा उच्चांकी विक्रम मोडण्याच्या तयारीत आहे. दोन्ही धातू लवकरच हा रेकॉर्ड इतिहासजमा करु शकतात. दरवाढीने ग्राहक हिरमुसला आहे. सोने-चांदीच्या किंमती इतक्या वधारल्या आहेत.
दिवाळीपासून सोन्याने मोठी उसळी घेतली. आतापर्यंत सोन्यात 1500 रुपयांची वाढ झाली. गेल्या आठवड्यात सोन्यात 700 रुपयांची वाढ झाली. या आठवड्याची सुरुवात पण दरवाढीनेच झाली. सोमवारी 27 नोव्हेंबर रोजी सोने 250 रुपयांनी महागले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,710 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीने गेल्या दोन आठवड्यात मोठी भरारी घेतली. 13 नोव्हेंबरपासून आजपर्यंत चांदीत 6600 रुपयांची दरवाढ झाली. गेल्या आठवड्यात 1400 रुपयांनी किंमती वधारल्या होत्या. 27 नोव्हेंबर रोजी किंमती 1000 रुपयांनी वाढल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 78,500 रुपये आहे.
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार 24 कॅरेट सोने 61,437 रुपये, 23 कॅरेट 61,191 रुपये, 22 कॅरेट सोने 56,276 रुपये झाले. 18 कॅरेट 46,078 रुपये, 14 कॅरेट सोने 35,941 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 73,046 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सोमवारच्या सुट्टीमुळे भाव अपडेट झाले नाहीत.