मुंबई – गेल्या एक दोन दिवसांपासून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र, या चर्चेला उर्मिला मातोंडकर यांनी पूर्णविराम दिला आहे.
शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताचा ऊर्मिला मातोंडकर यांच्याकडून इन्कार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी शिवसेनेने उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस केली होती. दरम्यान, उर्मिला मातोंडकर यांनी उद्या संध्याकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार असल्याचे सांगितले. तुम्ही सर्वजण देत असलेल्या पाठिंब्याबाबत आभार. मी उद्या संध्याकाळी चार वाजता प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहे. कृपया कोरोनाचे नियम पाळून उपस्थित राहा, जय महाराष्ट्र, असे ट्विट उर्मिला मातोंडकर यांनी केले आहे. , उर्मिला मातोंडकर ह्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताला शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी दुजोरा दिला होता.