मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक छोट्या मोठ्या शहरात आग लागण्याचे अनेक घटना घडत असतांना नुकतेच मुंबईतील गिरगाव येथील गोमती भवन नावाच्या इमारतीला लागलेल्या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागली. अग्निशमन दलाच्या सुमारे 12 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवली. इमारतीतून तीन जणांची सुटका करण्यात आली.
मुंबई अत्यंत गर्दीचा भाग असलेल्या गिरगाव येथील गोमती भवन या नावाच्या इमारतीला आग लागल्याची ही घटना घडली आहे. सदरील इमारत ही रहिवाशी असून इमारतीच्या तिसऱ्या, चौथ्या माळ्याला ही आग लागल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेकडून देण्यात आली आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली.
गिरगावातील गोमंती भवनाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मनपाच्या सुमारे 8 फायर इंजिन आणि अग्निशमन दलाचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी तैनात होते. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरु आहे. गेल्या काही महिन्यांपासून मुंबईतील इमारतींना सातत्याने आग लागण्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.