ॲड.शरदराव फुटाणे यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून समाजाचे ऋण फेडले; अमृत महोत्सवानिमित्त अक्कलकोट येथे सत्कार
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.३ : अक्कलकोट तालुक्यात १९७३ पासून ॲड.शरदराव फुटाणे यांनी वकिली सुरू केली व वकिली सेवेबरोबरच त्यांनी विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून चांगली समाजसेवा करून समाजाचे ऋण फेडले,असे गौरवोद्गार त्यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात विविध मान्यवरांनी बोलताना काढले.रविवारी,मैंदर्गी रोडवरील भोसले मंगल कार्यालयात ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.
शरदराव फुटाणे यांचा अमृत महोत्सवानिमित्त विविध संस्था,मान्यवर व्यक्ती आणि सहपरिवाराच्यावतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी
विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी तसेच
विधी क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने
उपस्थित होती.ॲड.शरदराव फुटाणे यांच्या
वकिली सेवेस देखील ५० वर्ष पूर्ण झाले.ते काही काळ फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते त्यानंतर सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष म्हणून १५ वर्षांपासून कार्यरत आहेत.या माध्यमातून विविध समाजपयोगी कार्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.सध्या ते अक्कलकोट राजेराय मठाचे अध्यक्ष म्हणून देखील कार्यरत आहेत.या संस्थेची ते गेल्या
४३ वर्षांपासून निरपेक्ष वृत्तीने सेवा बजावत आहेत.ज्यावेळी ते अक्कलकोट बार असोसिएशनचे अध्यक्ष होते.त्यांच्या काळात पहिल्यांदा अक्कलकोटमध्ये लोकन्यायालय झाले होते.त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता.आता पर्यंत त्यांना विविध क्षेत्रातून वेग – वेगळ्या संस्थाकडून अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले या सर्व घडामोडींवर आधारित तसेच त्यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित चित्रफीत उपस्थित मान्यवरांना दाखविण्यात आली. या चित्रफितीतून
त्यांच्या कार्याला उजाळा मिळाला.ॲड.
पल्लवी मोरे यांनी स्वागत केले.सत्काराच्या
प्रारंभी औक्षण करून परिवारातील अनेक
सदस्यांनी तसेच आप्तेष्टांनी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत ॲड.फुटाणे यांची गूळ,चादर तसेच ग्रंथतुला करण्यात आली.
सत्काराला उत्तर देताना ॲड.शरदराव फुटाणे म्हणाले,निस्वार्थ भावनेतून वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून आपण चांगले काम केल्याने एक प्रकारे मनाला समाधान मिळाले आणि आज जो सत्कार होत आहे ही त्या कामाची पोच पावतीच आहे या सत्काराने मी भारावलो आहे असेच प्रेम आणि सहकार्य यापुढेही राहावे,अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी कृषी पशुसंवर्धन सभापती मल्लिकार्जुन पाटील,राजीव माने,सुहास माने,
बसलिंगप्पा खेडगी,बाळासाहेब मोरे,यशवंत धोंगडे,डॉ.मनोहर मोरे,दिलीप सिद्धे,डॉ.गिरीश साळुंखे,शाम मोरे,डॉ.
शिवराया आडवीतोटे,ॲड.सुरेश गायकवाड,ॲड.विजय हर्डीकर,ॲड.अनिल मंगरूळे,डॉ.किसन झिपरे,
मोहन चव्हाण,शंकर पवार,शिवाजीराव पाटील,तानाजी चव्हाण,विलास गव्हाणे,बाबा निंबाळकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी गायकवाड, मोरे,गणेशवाडीचे शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.प्रा.प्रकाश सुरवसे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.ॲड.विकास फुटाणे यांनी आभार मानले.या सत्कार सोहळ्याच्या नियोजनासाठी फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जाधव – फुटाणे, सुमन जाधव- फुटाणे, दिपाली जाधव, शितल जाधव, पुनम जाधव, पल्लवी मोरे, पूनम माने, स्मिता माने, उज्वला इंगोले -पाटील, दत्ता कटारे,धनंजय गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मित्रमंडळीनी सहकार्य केले.