ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पदवीधर आणि शिक्षकसाठी दुधनीत शांततेत मतदान सुरू

 

गुरुराज माशाळ

अक्कलकोट, दि.१ : सध्या विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी शांततेत मतदान सुरू आहे.

पदवीधर मतदारसंघात एकूण ६२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत तर शिक्षक मतदार संघात ३५ जण रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. आज सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ झाला आहे.

दुधनी शहरात १०५ पदवीधर मतदार आहेत तर ८६ शिक्षक मतदार आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये दुधनी, सिन्नूर, मुगळी, इब्राहिमपूर, नागुर, बोरोटी(बु),संगोगी (ब), तळेवाड, बिंजगेर, सातन दुधनी, कल्लपवाडी, हालहल्ली (मै), बबलाद, अंदेवाडी (जा), चिंचोळी (मै) या गावातील मतदारांचा समावेश आहे.

दुधनी शहरातील हनुमान मंदिराच्या बाजूला असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदान केंद्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदाराला स्क्रिनिंग करून हातावर सॅनिटायझर मारून आत सोडले जात आहे.

मतदान केंद्राजवळ तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पुणे पदविधर मतदार संघासाठी 11.30 वाजे पर्यंत 105 पैकि 48 तर शिक्षक मतादार संघासाठी 86 पैकि 30 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!