ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता : शिंदे गटाच्या नेत्याचे सूचक विधान !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटलांचे राज्यभर दौरे सुरु असून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, अशी मागणी देखील केली आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. या मागणीमुळे मराठा आणि ओबीसी समाज आमने सामने आला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे राज्यातील आरक्षणाचा प्रश्न चिघळत चालला आहे. दरम्यान, उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे, याबाबतचं सूचक वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलं आहे.

आ.शिरसाट म्हणाले, “उद्यापासून सुरू होणारं अधिवेशन वादळी नव्हे तर धोरणात्मक निर्णयांनी गाजणारं अधिवेशन असणार आहे. उबाठा गटाने काय आरोप केले? काय प्रत्यारोप केले? यावर हे अधिवेशन चालणार नाही. या अधिवेशनात अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. ज्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला दिलासा मिळू शकतो.”

शिरसाट पुढे म्हणाले, “दुसरा प्रश्न असा आहे की, सध्या महाराष्ट्रात मराठा समाज, धनगर समाज आणि ओबीसी समाजाची आंदोलनं चालू आहेत. यावर सरकारकडून एखादी चांगली ठोस भूमिका घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार काय भूमिका घेतंय, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. म्हणून हे अधिवेशन महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि सर्व सामान्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.”

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!