मुंबई : वृत्तसंस्था
देशभरातील अनेक राज्यात बदलत्या हवामानामुळे अनेक शेतकरी हैराण झाले असून मिचॉंग चक्रीवादळामुळे हवामानावर परिणाम झाला आहे. भारताच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. याचा प्रभाव राज्याच्या हवामानावरही दिसून येत आहे. राज्यात पुढील दोन ते तीन दिवस तुरळक पावसाची शक्यता आहे. तर इतर ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल.
राज्यातील कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. इतर ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. तर मुंबई, पुण्यासह राज्यात पुढील 5-6 दिवसांत कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. सकाळी आणि रात्री थंडत वाढ होण्याचा अंदाज आहे. मिचॉंग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील हवामान पूर्णपणे बदलले होते. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागात आजही ढगाळ वातावरण राहणार आहे. बदलत्या वातावरणातील स्थितीमुळे काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
मुंबईत 14 डिसेंबरनंतर तापमानात मोठी घट होण्याची शक्यता आहे. मुंबईचे हवामान उत्तरेकडील वाऱ्यांवर अवलंबून असेल. सध्या तापमानात केवळ एक ते दोन अंशांची घट होऊ शकते. दरम्यान, 14 ते 15 डिसेंबर दरम्यान काही भागात मुसळधार हिमवृष्टीची शक्यता आहे, त्यामुळे मुंबईसह संपूर्ण राज्यात कडाक्याची थंडी वाढेल.