ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार कधीही पडणार ; माजी मुख्यमंत्र्यांचा दावा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशातील काही राज्यात विधानसभेच्या निवडणूक झाल्या असून भाजपला मोठे यश आले आहे. तर आता कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार कधीही पडू शकते असा दावा जनता दल (धर्मनिरपेक्ष) नेते एचडी कुमारस्वामी यांनी केला आहे. राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी रविवारी (10 डिसेंबर 2023) असा दावा केला की, कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमधील एक प्रभावशाली काँग्रेस मंत्री 50-60 आमदारांसह पक्ष सोडून भाजपमध्ये सामील होऊ शकतो.

जेडीएस नेते म्हणाले, “कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमध्ये सर्व काही ठीक नाही. हे सरकार कधी पडेल माहीत नाही. एक प्रभावशाली मंत्री आपल्यावरील खटले टाळण्यासाठी हतबल झाला आहे. “केंद्राने त्यांच्यावर असे खटले दाखल केले आहेत, ज्यात ते वाचण्याची शक्यता नाही.” महाराष्ट्रासारख्या राज्यात तर कधीही घडू शकते, तर कर्नाटकातही काहीही अशक्य नाही, असे ते म्हणाले. त्यांना त्या प्रभावशाली नेत्याचे नाव विचारले असता, छोट्या नेत्यांकडून अशा पावलाची अपेक्षा करता येत नाही, प्रभावशाली नेतेच ही पावले उचलतील, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

याआधीही कुमारस्वामी यांनी स्थिर सरकारवर भाष्य केले होते. 5 डिसेंबरला ते म्हणाले होते- “या देशाची परिस्थिती आता अशी आहे की प्रत्येकाला असे वाटते की स्थिर सरकारची गरज आहे. मला वाटतं 5 राज्यांतील निवडणुकांमधला लोकांचा मूड असाच होता… यावेळी आम्हाला स्थिर सरकार आणि स्थिर नेतृत्वाची गरज आहे आणि म्हणूनच आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो आहोत.

एचडी कुमारस्वामी म्हणाले, ‘हे सरकार ५ वर्षे टिकणार नाही. मे 2024 नंतर हे सरकार पडणार हे निश्चित आहे. हे सरकार कोणत्याही किंमतीत टिकणार नाही. जेडीएस नेत्याने आपल्या दाव्यामागचे कारणही सांगितले. ते म्हणाले, ‘काँग्रेसचे एक प्रमुख मंत्री केंद्रीय यंत्रणांकडून चौकशीला सामोरे जात आहेत. कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी ते भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहेत. सध्या त्यांची भाजप नेत्यांशी चर्चा सुरू असून पक्ष बदलाच्या प्रक्रियेत ते 50 ते 60 आमदारांना सोबत आणू शकतात.”

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!