मुंबई : वृत्तसंस्था
येत्या काही दिवसात लग्नसराई होत असून आतापासून वधूकडील मंडळी बाजारात खरेदीसाठी येत आहे पण काही दिवसापासून सोन्यासह चांदीच्या दरात चढ उतार होत असल्याने अनेक ग्राहकांच्या जीवाला घोर लागला होता. पण आता त्यांना दिलासा मिळाला आहे. उच्चांकावरुन सोने-चांदी माघारी फिरले आहेत. या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी पण मौल्यवान धातूत घसरण सुरु होती. गेल्या आठवड्यात या दरवाढीला मोठा ब्रेक लागला होता. सोने 65,000 रुपयांचा टप्पा ओलांडून आगेकूच करत होते. तर चांदीने पण 78,000 रुपयांचा टप्पा ओलांडला होता.
या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्यात 440 रुपयांची घसरण झाली. गेल्या आठवड्यात सोन्यात जवळपास 1500 रुपयांची घसरण झाली होती. सोमवारी, 11 आणि 12 डिसेंबर रोजी सोन्याच्या किंमती प्रत्येकी 220 रुपयांनी घसरल्या. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 56,900 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,060 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
या आठवड्यात चांदीत स्वस्ताई आली. 5 डिसेंबर रोजी चांदीमध्ये 2 हजारांची घसरण झाली. तर 6 डिसेंबर रोजी 300 रुपयांनी भाव घसरले. 7 डिसेंबर रोजी चांदीत 1000 रुपयांची घसरण झाली होती. या आठवड्यात 11 डिसेंबर रोजी भाव 200 रुपयांनी कमी झाले. मंगळवारी किंमतीत 100 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 75,700 रुपये आहे.