ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कोल्हापुरात भाजपचा रथ जनतेने अडवला अन केला प्रश्नांचा भडीमार !

कोल्हापूर : वृत्तसंस्था

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोलीत भाजपच्या आगामी लोकसभेच्या तयारीसाठी जाहिरातीचा फंडा असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ अडवून नागरिकांनी प्रश्नांचा अक्षरश: भडीमार केला. संकल्प यात्रेत शासकीय कर्मचारी असलेले ग्रामसेवक दिसून आल्याने गावकऱ्यांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. यामध्ये त्यांना अनेक प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. देशाचे सरकार की मोदीचे सरकार? एका व्यक्तीचे सरकार असते का? एकट्या पंतप्रधानांचे सरकार असते का? योजना एकट्याच्या असतात का? भारत सरकार शब्द का वापरला नाही? सेल्फी पाँईंटला तिरंगा का नाही? भाजपच्या झेंड्यासारखे का दिसत आहे? अशा अनेक प्रश्नांचा भडिमार गावकऱ्यांनी केला आहे. मोदी साहेबांचे म्हणजे काय? तुम्ही अधिकारी कोणाचे? अशीही विचारणा करण्यात आली. आमच्या गावात आला आहात, तर उत्तरे दिली पाहिजेत, असेही गावकरी म्हणाले.

‘आपला संकल्प विकसित भारत रथ’ गावात पोहोचल्यानंतर योजनांच्या नावावर फक्त मोदी दिसून आल्याने या योजना व्यक्तीच्या की भारत सरकारच्या? अशी विचारणा गावकऱ्यांकडून करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोलीत भाजपच्या आगामी लोकसभेच्या तयारीसाठी जाहिरातीचा फंडा असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ अडवून नागरिकांनी प्रश्नांचा भडीमार केला आहे. दरम्यान रथाच्या पदाधिकाऱ्याने योजना भारत सरकारची असल्याचे सांगितले. यानंतर तर भारत शब्द का नाही? सेल्फी पाँईंटवर तिरंगा का नाही? अशा विविध प्रश्नांनी भंडावून सोडले. उज्वला योजनेची जाहिरात केली जात आहे, पण 365 रुपयांचा गॅस हजार रुपयाला केल्याचेही गावकरी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!