ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पंतप्रधान मोदींच्या उपस्थिती राजस्थानात शर्मांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशातील भाजपने मध्यप्रदेशात मुख्यमंत्री पदाची घोषणा केल्यानंतर आता १५ डिसेंबर रोजी राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागलेले भजनलाल शर्मा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जयपुरच्या ऐतिहासिक अल्बर्ट हॉलच्या बाहेर हा सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीही हजर होते. पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डाही उपस्थित होते.

राजस्थानच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा जयपूरमध्ये पार पडला. जयपुरच्या ऐतिहासिक अल्बर्ट हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. राज्यपाल कलराज मिश्रा यांनी भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. तसेच दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. तसेच 6 राज्यांचे मुख्यमंत्रीही सोहळ्यात सहभागी झाले होते. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि वसुंधरा राजेही व्यासपीठावर उपस्थित होते.

भजनलाल शर्मा यांच्याशिवाय आज आमदार दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांनी मंत्रिमंडळ सदस्य म्हणून शपथ घेतली. भारतीय जनता पक्षाने (भाजप) दोघांनाही उपमुख्यमंत्रीपदासाठी उमेदवारी दिली होती. राज्यपाल कलराज मिश्रा यांनी या तिन्ही नेत्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!