ध्यास विश्वसार्ह बातमीचा

श्री परमेश्वर मंदिर सभामंडपसाठी लाखो रुपयांचा कामाचा धडाका !

वागदरीत आमदार कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नातून ३८ लाखांच्या कामाचा शुभारंभ

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या माध्यमातून पर्यटन विकास विभागाकडून व अन्य निधीतून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ हन्नूरचे उपसरपंच सागर कल्याणशेट्टी यांच्या हस्ते वागदरी येथे पार पडला. वागदरी येथील श्री परमेश्वर मंदिर सभामंडपसाठी २५ लाख रुपये व तसेच २५१५ योजनेअंतर्गत श्री घाळीदास मंदिर सभामंडपसाठी ७ लाख रुपये आणि वार्ड क्रमांक ४ मधील माने घर ते भरमदे-कणमुसे घरापर्यंत सिमेंट रस्ता आणि बंदिस्त गटारसाठी ६ लाख असे एकूण ३८ लाख रुपयेची कामे होणार आहेत. ही कामे कमीत कमी वेळात पूर्ण करण्याचा मानस यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.

याप्रसंगी ज्येष्ठ नेते श्रीशैल ठोंबरे,मंदिर समितीचे सचिव मल्लप्पा निरोळी, बसवराज शेळके,प्रदीप जगताप,सरपंच श्रीकांत भैरामडगी, लक्ष्मीबाई पोमाजी,सुनील सावंत,प्रकाश पोमाजी, घाळय्या मठपती,कमलाकर सोनकांबळे,राजकुमार हुग्गे,हनिफ मुल्ला, शिवा घोळसगाव,रमेश मंगाणे,श्रीमंत कुंठोजी,शिवशरण यमाजी,परमेश्वर खसगी,दयानंद कुंभार,रमेश मंगाने, मकबूल कणमुसे, परमेश्वर शेळके,विरभद्र पुरंत,माळप्पा धनगर, परमेश्वर मंदिर पंच कमिटी,परमेश्वर आराधना पंच कमिटी,घाळीदास मंदिर पंच कमिटीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!