ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दादांनी आपला दरारा केंद्रात दाखवावा ; खा.कोल्हे यांची टीका !

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी फुट पडल्यानंतर आज देखील शरद पवार गटातील काही नेते अजित पवारांच्या कार्यक्रमाला उपस्थिती देतात. मात्र गेल्या काही महिन्यापासून खा.अमोल कोल्हे हे देखील अजित पवार गटात जातील अशी चर्चा सुरु असतांना मात्र खा.कोल्हे यांनी थेट अजित दादांवर टीका केल्याने आता हि चर्चा थांबली आहे.

खा.कोल्हे म्हणाले कि, दादांचा दरारा सर्वांना माहित आहे. त्यांनी तो दरारा केंद्रात दाखवावा आणि ठामपणे सांगावे की आमचा शेतकरी संकटात आहे कांद्यावरील निर्यातबंदी तातडीने उठवा अशी टीका देखील त्यांनी केली आहे. अमोल कोल्हे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.

शिरूर लोकसभा मतदारसंघात मी महायुतीचा उमेदवार निवडून आणून दाखवणार असे अजित पवार यांनी म्हंटले होते. याबाबत बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, मी सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. एवढ्या मोठ्या उंचीच्या नेत्याने मला आव्हान देणे ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. दादा मोठे नेते आहेत. त्यांच्याविषयी नेहमीच आदर राहील. त्यांचे हे असे विधान असेल तर भेटून मी त्यांची भूमिका समजून घेईन”, असे अमोल कोल्हे म्हणाले.
तसेच पुढे अमोल कोल्हे म्हणाले” अजितदादा हे मोठे नेते आहेत. मी 2019 मध्ये जिथे उभा होतो आजही 2023 मध्ये तिथेच उभा आहे. त्यांनी भूमिका बदलली. त्यांना कान धरण्याचा अधिकार होता मात्र सोबत होतो तेव्हाच त्यांनी माझे कान का धरले नाहीत?” असे अमोल कोल्हे म्हणाले. तसेच शिरूर मतदारसंघात दादांनी पाहणी केली. यासाठी मी त्यांचा आभारी आहे. नागरिकांसाठी हा उड्डाणपूल खुला करावा अशी मागणी 6 महिन्यांपूर्वीच दादांकडे केली होती. आता अपेक्षा आहे की, आज त्यांनी पाहणी केल्यानंतर नागरिकांच्या सोयीचा निर्णय घेतला जाईल”, असे मत देखील अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!