अक्कलकोट, दि.२६ : दत्त जयंती निमित्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात ब्रम्ह मुहूर्तावर पहाटे काकड आरती नंतर श्री स्वामी समर्थांना ११११ किलो फळांचा नैवेद्य पहाटे ५ वाजून १५ मिनिटांनी अर्पण करण्यात आला.अशा प्रकारचा नैवेद्य दाखविण्याची पहिलीच वेळ आहे.मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा संपन्न झाली. पुरोहीत व्यंकटेश पुजारी यांनी श्रीना हा नैवेद्य अर्पण केला. श्री नैवेद्यनंतर उपस्थित साधारण साडे सहा हजार भक्तांना सर्व प्रकारची फळे प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. हा उपक्रम पुण्यातील श्री स्वामी समर्थ सेवा सार संघाच्यावतीने स्वामीभक्त स्वामी वृंदावन दास, गणेश बारटक्के, स्थानिक स्वामीभक्त सुधीर माळशेट्टी यांच्या विशेष परिश्रमासह सेवासार संघाच्या ३० सेवेकऱ्यांच्या परिश्रमातून संपन्न झाला.यावेळी विश्वस्त महेश गोगी, मंदार महाराज पुजारी, व्यंकटेश पुजारी, श्रीशैल गवंडी, अविनाश क्षीरसागर, सागर गोंडाळ, श्रीकांत मलवे, सचिन हन्नुरे, जयप्रकाश तोळणुरे, ऋषिकेश लोणारी आदीसह अन्य स्वामी भक्त उपस्थित होते.