---Advertisement---

व्यावसायात तोटा तर या राशींना आजचा दिवस असणार अनुकूल !

By team
On: December 27, 2023 8:50 AM
Follow Us:
---Advertisement---

आजचे राशिभविष्य दि २७ डिसेंबर २०२३

मेष : आर्थिक लाभ होईल. नातेवाईंकाच्या घरी जाऊन एखाद-दोन दिवस घालवलेत तर दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम मिळेल. मनाला पटतील अशा पैसा कमाविण्याच्या नवीन संकल्पनांचा लाभ घ्या. जोडीदार यापूर्वी इतका छान कधीच नव्हता याची अनुभूती येईल.

वृषभ : धन लाभ होण्याची शक्यता. आजचा दिवस अनुकूल. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. खरेदी मोहीम आणि अन्य कामकाज यातच तुमचा दिवसभरातील भरपूर वेळ खर्च होईल. जोडीदार तुमची गरज भागवू शकणार नाही, त्यामुळे तुमची चिडचिड होईल.

मिथुन : धन लाभ होण्याची शक्यता. खाजगी नातेसंबंध संवेदनशील आणि कमजोर असतात. दीर्घकालीन प्रकल्प रखडू शकतो. वेळेचा सदुपयोग करणे शिकले पाहिजे. जोडीदाराच्या एखाद्या कृतीमुळे तुमची चिडचिड होईल.

कर्क : खर्च वाढतील. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. प्रलंबित प्रकल्प आणि योजनांना अंतिम स्वरूप मिळेल. ज्या नात्याला तुम्ही महत्व देतात त्यांना वेळ देणे ही तुम्हाला शिकावे लागेल अथवा नाते तुटू शकतात. एखाद्या गोड आठवणीमुळे तुमच्यातील क्षुल्लक भांडण मिटून जाईल.

सिंह : आर्थिक स्थिती सामान्य. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. अन्य देशांतील लोकांशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सध्याचा काळ अतिशय योग्य आहे. वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण, तुम्ही या सगळ्याला पुरून उराल.

कन्या : विश्वासनीयता तपासूनच योजनेत गुंतवणूक करा. किरकोळ आणि ठोक व्यापाऱ्यांसाठी चांगला दिवस. खरेदी मोहीम आणि अन्य कामकाज यातच तुमचा दिवसभरातील भरपूर वेळ खर्च होईल. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात, तुमचा/तुमची जोडीदार हे आज सिद्ध करेल.

तूळ : खर्च वाढतील. तुमच्या मनावर असलेले ओझे उचलण्यास आणि तुम्हाला पाठिंबा देण्यात नातेवाईक पुढाकार घेतील. कामाच्या ठिकाणी केलेल्या कष्टांचे चीज होणार आहे. आजच्या एवढं तुमचं वैवाहिक आयुष्य कधीच रंगीबेरंगी नव्हतं.

वृश्चिक : आर्थिक फायदा होईल. कौटुंबिक जबाबदाऱ्यांचं डोक्यावर येतील आणि मनावर दडपण येईल. आपल्या जोडीदाराच्या अनुपस्थितीची उणीव भासण्याची शक्यता. कार्य क्षेत्रात तुमचा प्रतिद्वंदी आज तुमच्या विरुद्ध कट रचू शकतो.
धनु : किमती वस्तूची चोरी होण्याची शक्यता. धार्मिक स्थळी किंवा एखाद्या संतसदृश माणसाला भेटून मन:शांती मिळेल. तुम्ही तुमच्या प्रिय पत्नीशी पूर्वी झालेल्या मतभेदांबद्दल तिला माफ कराल तर तुमचे जीवन सुकर होईल. क्रिएटीव्ह स्वरूपाच्या प्रकल्पावर काम करा.

मकर : लहान व्यवसाय करणारे या राशीतील जातकांना आज तोटा होऊ शकतो. तुमची मेहनत योग्य दिशेत आहे तर तुम्हाला चांगले फळ नक्कीच मिळतील. वैवाहिक आयुष्यातील आजचा दिवस उत्तम असणार आहे.

कुंभ : कमिशन, लाभांश किंवा मानधन याद्वारे फायदे मिळतील. करिअरवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी इतर आउटडोअर उपक्रमांकडे असणाऱ्या मुलांच्या ओढ्यामुळे तुम्हाला निराशा येऊ शकते. महत्त्वाच्या विषयांवर लक्ष द्या. तुमचा मूड ऑफ असल्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारावर वैतागाल.

मीन : आर्थिक दृष्टीने दिवस चांगला. कलात्मक क्षमतेमुळे अनेक लोकांची कौतुकाची थाप मिळेल. आज तुम्ही आपल्या जीवनसाथीला सरप्राईझ देऊ शकतात. आपल्या सर्व कामांना सोडून आज तुम्ही त्यांच्या सोबत वेळ घालवू शकतात.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!