ध्यास विश्वसार्ह बातमीचा

स्तुत्य उपक्रम : मुलाच्या वाढदिवसानिमित्त गावाचा पाण्याचा प्रश्न सोडविला !

ग्रा.पं सदस्य अमोल पुटगे यांचा उपक्रम

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

सलगर येथील युवा ग्रामपंचायत सदस्य अमोल पुटगे यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त गावातील पाणीटंचाई ओळखून मोफत बोअर मारून देत गावाची पाण्याची समस्या सोडविली आहे. मुलगा स्वराज्य पुटगे याच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हा उपक्रम राबविला आहे.

यावर्षी अत्यल्प पावसामुळे सर्वत्र दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे उन्हाळ्यात देखील यावर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.संभाव्य दुष्काळी स्थिती लक्षात घेऊनच मुलाच्या वाढदिवसावरचा अनाठायी खर्च कमी करून स्वराज्य याच्या आई स्वरा व वडील अमोल पुटगे यांनी हा निर्णय घेतला. सुदैवाने या बोअरला देखील मोठ्या प्रमाणात पाणी लागले असून याचा फायदा सलगर ग्रामस्थांना होणार आहे.तालुक्यात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अशाच प्रकारे सामाजिक कार्य करून नावलौकिक मिळवला आहे त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊनच गावाप्रती सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे,असे पुटगे यांनी सांगितले.

यावेळी माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी,भाजप नेते नन्नु कोरबु,वंचितचे नेते चंद्रशेखर मडीखांबे,प्रहारचे अमर शिरसट,मल्लेशी शेळके, इरणणा धसाडे,प्रवीण शटगार,इक्बाल बिराजदार, अशोक पाटील,श्रीशैल बिराजदार,संजय डोंगराजे,निजप्पा गायकवाड,धोंडुराज बनसोडे,अजय दुपारगुडे,अशोक बिराजदार,आकाश माने,अजय मुकणार आदिंसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परशुराम भगळे यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार अमोल पुटगे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!