ध्यास विश्वसार्ह बातमीचा

वाराणसीच्या दीक्षित कुटुंबीयांची जेऊरच्या ग्रामस्थांनी घेतली भेट

स्वग्राम दक्षिणकाशी जेऊरला भेट देण्याचे केले स्पष्ट

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी होणाऱ्या रामललांच्या मूर्तींचा अभिषेक सोहळा पूजन मूळचे जेऊर (ता.अक्कलकोट) चे असलेले वेदिक पंडित लक्ष्मीकांत मथुरानाथ दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. याबाबतचे वृत्त समजताच शुक्रवारी वेदिक पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या कुटुंबीयांची श्री काशीविश्वेश्वर देवस्थान कमिटी व ग्रामस्थ मंडळी जेऊरच्यावतीने मल्लिकार्जुन पाटील व इतरांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन आदर भाव व्यक्त केला.

यावेळी पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचा श्री काशी विश्वेश्वराची मूर्ती व प्रतिमा देऊन सन्मान केला. यावेळी दक्षिणकाशी जेऊरच्या भेटीसाठी येण्याचे निमंत्रण दिले.त्यांनी मूळ गावी येऊन श्री काशिलिंगाचे दर्शन घेऊन ग्रामस्थांची भेट घेण्याचे मान्य केले. जेव्हापासून काशीचे दीक्षित कुटुंबीय हे जेऊरचे असल्याचे कळाले तेव्हापासून जेऊर आणि सोलापूर जिल्ह्यात अपार आनंद व्यक्त होत आहे. त्या अनुषंगाने आज काशी येथे काशीविश्वेश्वर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील यांनी आपल्या ग्रामस्थ सोबतीसह दीक्षित कुटुंबीयांची भेट घेतली. पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचे चिरंजीव सुनील दीक्षित यांनी दिलेल्या माहितीनुसार दीक्षित कुटुंबीय हे बाराव्या पिढीच्या अगोदरपासून काशी येथे वास्तव्यास आहेत परंतु कोल्हापूर येथील त्यांचे हवाई दलात सेवानिवृत्त असलेले काका विश्वनाथ मथुरानाथ दिक्षित यांनी त्यांच्या पूर्वजांकडून दिलेल्या माहितीनुसार आम्ही दीक्षित कुटुंबीय हे सोलापूर जवळील जेऊर येथीलच असल्याचे आम्हाला सांगितले आहे. आम्ही काशीला जवळपास बाराव्या पिढीपासून येथेच राहत आहोत. आमच्या मूळ वास्तव्याच्या तळाची माहिती घेत असताना जेऊरचे नाव पुढे आले आणि त्यानुसार आम्हाला जेऊर हे आमचे पूर्वजांचे मूळ गाव असल्याचे समजले. आमचे कुलदैवत अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

आज आमच्या कुटुंबीयांचे नागणसूर येथील बम्मलिंगेश्वर मठाचे बम्मलिंगेश्वर देवरू महास्वामी(चिक्क गुरुगळू),इरण्णा कणमुसे,खंडप्पा वग्गे,शिवराज बोरीकरजगी,विश्वनाथ नळगे आदींनी भेट घेऊन आमचे मुळगाव असलेल्या दक्षिणकाशी जेऊरच्या स्वयंभू श्री काशीलिंगाचे महात्म्य सांगितले. हे अतिशय चांगले आणि श्रद्धेचे ठिकाणी आहे त्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे.आणि त्यांनी जेऊरला येण्याचे निमंत्रण दिले ते आमच्या कुटुंबीयांनी स्वीकारले असून आम्ही जेऊर येथे जाऊन भेट देणार आहोत,असेही त्यांनी सांगितले.
जेऊरवासियांसाठी आनंदाचा क्षण

राम लल्लांच्या अभिषेक सोहळ्यांचे नेतृत्व करणारे पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या कुटुंबियांची वाराणसी येथे भेट घेऊन त्यांचा सन्मान केला. त्यांना जेऊरचे महात्म्य सांगितले यावेळी त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी जेऊरच्या काशिलिंगाच्या पवित्र स्थानी म्हणजेच त्यांच्या मूळ गावी येऊन भेट देण्याचे निश्चित केले आहे.
– मल्लिकार्जुन पाटील,अध्यक्ष श्री काशीलिंग देवस्थान जेऊर

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!