अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
स्वामी समर्थ कारखान्याचे माजी उपाध्यक्ष काशिनाथ भरमशेट्टी यांच्या सातव्या स्मृतीदिनानिमित्त हन्नुर येथे के.बी.प्रतिष्ठान आणि भरमशेट्टी परिवाराच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती या प्रतिष्ठानचे आधारस्तंभ विश्वनाथ भरमशेट्टी यांनी दिली.शनिवार दि.६ जानेवारी रोजी महादेव मंदिर येथे सकाळी १० वाजता अश्विनी ब्लड बँक कुंभारी व सोलापूर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबीराचे उदघाटन स्वामी समर्थ कारखान्याचे अध्यक्ष संजीवकुमार पाटील यांच्या हस्ते होणार आहे.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सदस्य तुकाराम बिराजदार हे राहणार आहेत.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी उपसभापती सिध्दार्थ गायकवाड, पं.समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे,दिलीप बिराजदार, अशपाक अगसापुरे,व्यंकट मोरे,राजू चव्हाण,इरसंगप्पा गड्डे,राजकुमार पाटील,सिध्दाराम भंडारकवठे,बसवराज बाणेगांव,संजय बाणेगाव,डॉ.शिवशरण काळे,हेमंत हंडगे, चिदानंद माळगे आदींची उपस्थिती राहणार आहेत.ग्लोबल हॉस्पिटलचे चेअरमन डॉ.अमजद सय्यद व डॉ.बसवराज सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत ईसीजी व रक्ततातील कोलेस्ट्रॉलची तपासणी होणार आहे.यावेळी रक्तदात्यांना के.बी.प्रतिष्ठानकडून प्रवाशी बॅग देण्यात येणार आहे.
तरी या कार्यक्रमांना परिसरातील ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैभव भरमशेट्टी ,उपाध्यक्ष रमेश छत्रे,सचिव गौरीशंकर भरमशेट्टी,ऍड. विशाल भरमशेट्टी,राजकुमार भरमशेट्टी, तिपण्णा हेगडे,बसवणप्पा सुतार, योगीराज भरमशेट्टी,शब्बीर मुल्ला,सचिन बिडवे,चंद्रकांत जंगले,नरेंद्र जंगले, निरंजन हेगडे,परशुराम बाळशंकर आदी उपस्थित होते.